परभणी : दुधनातून वाळूचा बेसुमार उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 12:42 AM2019-07-27T00:42:09+5:302019-07-27T00:42:41+5:30

समाधानकारक पाऊस नसल्याने अद्यापही दुधना नदीचे पात्र कोरडेठाक आहे. याचाच फायदा वाळू तस्करांनी उचलला असून अनेक भागातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Parbhani: An abundance of sand from milk | परभणी : दुधनातून वाळूचा बेसुमार उपसा

परभणी : दुधनातून वाळूचा बेसुमार उपसा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : समाधानकारक पाऊस नसल्याने अद्यापही दुधना नदीचे पात्र कोरडेठाक आहे. याचाच फायदा वाळू तस्करांनी उचलला असून अनेक भागातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सेलू तालुक्यातील डिग्रस खु. येथील वाळू धक्क्याचा लिलाव झालेला आहे. या ठिकाणाहून ६०० ब्रास वाळू उचलण्याची परवानगी संबंधित ठेकेदाराला महसूल प्रशासनाने दिली आहे. या ठेक्याशिवाय रोहिणा, खेर्डा आणि राजा व हातनूर शिवारातूनही वाळूचा अवैध उपसा करून वाहतूक केली जात आहे. अगोदरच दुधना नदी पात्र कोरडे पडले आहे. त्यातच अनेक वर्षापासून वाळूचा बेसुमार उपसा केला जात असल्याने नदीपात्रात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. दुष्काळी परिस्थिती असताना ज्या ठिकाणी वाळू शिल्लक आहे, तेथून वाळू तस्कर ट्रॅक्टरद्वारे वाळूचा अवैध उपसा करत आहेत. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी पाथरी आणि पूर्णा परिसरातूनही गोदावरी नदीच्या पात्रातून वाळू हायवा टिप्परद्वारे सेलू शहरात विक्री केली जात आहे. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरु असतानाही महसूल प्रशासनाचे अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याची चर्चा सुरु आहे. महसूल विभागातील काही कर्मचारी वाळू तस्कराचे हस्तक बनले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांचे लोकेशन तस्करांना सहज उपलब्ध होत आहे. तर काही अधिकारी माहिती असूनही या प्रकाराकडे कानाडोळा करीत आहेत. १ ब्रासचे वाळूचे ट्रॅक्टर साधारणपणे ३ ते ४ हजार रुपयांना विकले जात आहे. तर गोदावरी पात्रातून हायवाद्वारे वाहतूक केली जाणारी वाळू हजारोच्या दराने विक्री होत आहे. रात्रीच्या वेळी वाळू तस्कर चार चाकी वाहन घेऊन अवैध वाळू वाहतुकीच्या गस्तीवर असतात. तरीही या अधिकाऱ्यांना अवैध वाळू वाहतुकीचे वाहन चालक गुंगारा देत आहेत. डिग्रस येथील वाळू धक्क्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत आहे; परंतु, येथील वाळू धक्क्याच्या नावावर इतर ठिकाणाहून उचललेली वाळूही तस्कर पचवत आहेत.
रात्रीस : खेळ चाले...
४मध्यरात्री अवैध वाळू उपसा करुन वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक केली जात असताना वाळू तस्करांची टोळी वाहन रिकामे करेपर्यंत गस्त घालते. एखाद्यावेळी अधिकारी आलेच तर वाहनचालकाला काही वेळातच मोबाईलद्वारे माहिती दिली जाते. त्यानंतर वाहनचालक त्याच ठिकाणी वाळू टाकून पसार होतात.
४रात्री रायगड कॉर्नर, पाथरी नाका या परिसरात वाळू तस्करांचा खेळ सुरु असतो. अधिकारी मूग मिळून गप्प बसल्याने वाळू तस्करांचे चांगलेच फावले आहे. दररोज हजारो रुपयांची कमाई वाळूच्या माध्यमातून केली जात आहे. या प्रकाराकडे सोयीस्करपणे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हाधिकारी यांनीच लक्ष घालणे गरजेचे झाले आहे.
अवैध वाळूचा उपसा करुन वाहतूक केली जात असेल तर या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसेच अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पथके नेमली आहेत. रात्रीच्या वेळी जर काही वाहने वाळूचा अवैधपणे उपसा करुन वाहतूक करत असतील तर कारवाई केली जाईल.
-बालाजी शेवाळे, तहसीलदार, सेलू

Web Title: Parbhani: An abundance of sand from milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.