परभणी : पूर्णा नदीवरील रेल्वे पूल कामास मिळाली गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:15 AM2019-02-14T00:15:06+5:302019-02-14T00:16:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पूर्णा : परभणी -मुदखेड दुहेरीकरण मार्गाच्या पूर्णत्वासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पूर्णा नदीवरील रेल्वे पुलाच्या कामास गती प्राप्त ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : परभणी-मुदखेड दुहेरीकरण मार्गाच्या पूर्णत्वासाठी महत्त्वाचा ठरणाऱ्या पूर्णा नदीवरीलरेल्वे पुलाच्या कामास गती प्राप्त झाली असून, काही महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़
मुदखेड, नांदेड, पूर्णा व परभणी दरम्यान, दुहेरीकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक लहान, मोठ्या पुलांचे काम सुरू आहे़ काही कामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत़ सद्यस्थितीत नांदेड ते लिंबगाव व परभणी ते पिंगळी दुहेरी मार्ग सुरू असून, मागील अनेक महिन्यांपासून या मार्गाच्या दोन्ही बाजुंनी रेल्वेची ये-जा सुरू आहे़ दुहेरीकरणाच्या या टप्प्यातील महत्त्वाचा दुवा ठरणाºया पूर्णा नदीवरील पुलाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आह़े़ नदीपात्रात वारंवार येणाºया पाण्यामुळे पुलाच्या रुंदीकरणाचे काम वेळोवेळी बंद पडत होते़ पुलाच्या पूर्णत्वासोबतच दुहेरीकरणाचे काम पूर्ण होण्याची मुदत डिसेंबर २०१९ पर्यंत निर्धारित करण्यात आली आहे़ त्या पार्श्वभूमीवर पूर्णा परिसरातील रेल्वे रूळ टाकण्याच्या कामासोबतच रेल्वे पुलाच्या कामाला काही दिवसांपासून गती आली आहे़ आगामी काही महिन्यात रेल्वे रुंदीकरणाचे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ पुलाची मजबुती व सुरक्षेबाबतची योग्य तपासणी करून तो पुढे वाहतुकीसाठी खुला होणार आहे़
अधिकाºयांकडून वारंवार चाचपणी
पूर्णा परिसरात रेल्वे रुंदीकरण कामासाठी सुरू असलेल्या कामाचा दर्जा पाहण्यासाठी नांदेड रेल्वे विभागातील अधिकाºयांकडून वेळोवेळी चाचपणी करण्यात येत आहे़