परभणी : विद्यार्थ्यांच्या गणेवशासाठीचे ५ कोटी शाळांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:35 PM2019-06-17T23:35:05+5:302019-06-17T23:35:22+5:30

जिल्हा परिषद शाळांमधील ८४ हजार ९३० विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ५ कोटी ९ लाख ५८ हजार रुपयांचा निधी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी संबंधित मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिली.

Parbhani: On the account of 50 million schools for students' education | परभणी : विद्यार्थ्यांच्या गणेवशासाठीचे ५ कोटी शाळांच्या खात्यावर

परभणी : विद्यार्थ्यांच्या गणेवशासाठीचे ५ कोटी शाळांच्या खात्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषद शाळांमधील ८४ हजार ९३० विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ५ कोटी ९ लाख ५८ हजार रुपयांचा निधी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी संबंधित मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी दिली.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व मुली, अनुसूचित जाती, जमाती व बीपीएलमधील मुले, मुलींसाठी गणवेश घेण्यासाठी प्रति विद्यार्थी ६०० रुपये शासनाने मंजूर केले आहेत. या विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध व्हावा, यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी निधी वर्ग करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. या पार्श्वभूमीवर १७ जूनपासून शैक्षणिक वर्षास प्रारंभ झाला. त्यानुसार शाळेच्या पहिल्याच दिवशी ८४ हजार ९३० विद्यार्थ्यांसाठी ५ कोटी ९ लाख ५८ हजार रुपयांचा निधी गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमार्फत संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याचे प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड यांनी सांगितले. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील १० हजार ४१० विद्यार्थ्यांसाठी ६२ लाख ४६ हजार, जिंतूर तालुक्यातील १५ हजार २३९ विद्यार्थ्यांसाठी ९१ लाख ४३ हजार ४००, मानवत तालुक्यातील ६ हजार २५० विद्यार्थ्यांसाठी ३७ लाख ५० हजार, पालम तालुक्यातील ६ हजार ५५ विद्यार्थ्यांसाठी ३६ लाख ३३ हजार, परभणी तालुक्यातील १५ हजार ५७१ विद्यार्थ्यांसाठी ९३ लाख ४२ हजार ६००, पाथरी तालुक्यातील ८ हजार ९२४ विद्यार्थ्यांसाठी ५३ लाख ५४ हजार ४००, पूर्णा तालुक्यातील ८ हजार ७०३ विद्यार्थ्यांसाठी ५२ लाख २१ हजार ८००, सेलू तालुक्यातील ७ हजार ७०४ विद्यार्थ्यांसाठी ४६ लाख २२ हजार ४००, सोनपेठ तालुक्यातील ५ हजार २८४ विद्यार्थ्यांसाठी ३१ लाख ७० हजार ४०० आणि परभणीतील ७९० विद्यार्थ्यांसाठी ४ लाख ५४ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. या निधीतून पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ गणवेश उपलब्ध करुन देण्यात यावेत, असे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले असून याबाबतचा कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेशित करण्यात आले असल्याचे आशा गरुड यांनी सांगितले.
६२ हजार मुलींना मिळणार गणवेश
४शिक्षण विभागाच्या निकषानुसार एकूण ८४ हजार ९३० विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार असून त्यात ६२ हजार ९८९ मुलींचा समावेश आहे. याशिवाय अनुसूचित जातीतील १० हजार ६५०, अनुसूचित जमातीतील १ हजार ९८८ व बीपीएलमधील ९ हजार ३०२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Web Title: Parbhani: On the account of 50 million schools for students' education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.