परभणी : ९६ लाख निराधारांच्या खात्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:20 AM2018-10-15T00:20:56+5:302018-10-15T00:21:57+5:30
तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तहसील प्रशासनाच्या वतीने ९५ लाख ८० हजार २०० रुपये निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर अनुदानाचे पैसे उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना तहसील प्रशासनाच्या वतीने ९५ लाख ८० हजार २०० रुपये निराधार लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर अनुदानाचे पैसे उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गंगाखेड तालुका व शहरी भागातील श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, अपंग, विधवा या योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान दिले जाते. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गंगाखेड, महातपुरी, राणीसावरगाव, सुप्पा, वडगाव व दैठणा या शाखेत यासह महाराष्टÑ ग्रामीण बँक, भारतीय स्टेट बँक, सिंडीकेट बँक, बँक आॅफ महाराष्टÑा, युको, आयडीबीआय या बँकांचे शाखेत २०१८ पर्यंतचे निराधारांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. श्रावणबाळ व इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेतील ६ हजार ६५ लाभार्थ्यांसाठी ७३ लाख ४ हजार रुपये, संजय गांधी योजनेतील १ हजार ७१८ लाभार्थ्यांसाठी २१ लाख २८ हजार २०० रुपये, संजय गांधी विधवा योजनेतील १५८ लाभार्थ्यांसाठी १ लाख २६ हजार ४०० रुपये, अपंग योजनेतील १२ लाभार्थ्यांसाठी २१ हजार ६०० रुपये असे एकूण ९५ लाख ८० हजार २०० रुपये विविध योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. ऐन दसऱ्याच्या तोंडावर निराधारांना अनुदान मिळत असल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.