परभणी : कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 10:20 PM2020-03-01T22:20:43+5:302020-03-01T22:21:11+5:30
बाजार समितीचा कर चुकवून दुसºया बाजारपेठेत माल विक्रीसाठी नेणाºया दोन व्यापाºयांवर जिंतूर बाजार समितीच्या अधिकाºयांनी कारवाई करुन १० हजार ९०० रुपयांची मार्केट फिस वसूल केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): बाजार समितीचा कर चुकवून दुसºया बाजारपेठेत माल विक्रीसाठी नेणाºया दोन व्यापाºयांवर जिंतूर बाजार समितीच्या अधिकाºयांनी कारवाई करुन १० हजार ९०० रुपयांची मार्केट फिस वसूल केली आहे.
जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ट्रक क्र. एम.एच. २२/३१४१ आणि ट्रक क्रमांक एम.ए. २७ एक्स-७५३१ या दोन वाहनांतून बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील माल इतर बाजारपेठेत विक्री करण्यासाठी नेला जात होता़ जिंतूर-येलदरी रस्त्यावर या दोन्ही वाहनांना अडविण्यात आले़ व्यापाºयांकडे बाजार समिती कराची पावती नसल्याने दोन्ही व्यापाºयांविरूद्ध कारवाई करण्यात आली. दोन्ही व्यापाºयांकडून १० हजार ९०० रुपयांची मार्केट फिस वसूल करण्यात आली़ ही कारवाई सचिव एस़बी़ काळे, सहसचिव जीक़े़ हारगावकर, पी़एल़ लिखे, एलक़े़ गायकवाड़, ए़बी़ पवार, गारकर, राठोड यांच्या पथकाने केली़ व्यापाºयांनी बाजार समितीची मार्केट फिस व सुपरव्हिजन फिस भरणा करूनच माल विक्री करावा, अन्यथा बेकायदेशीर खरेदी-विक्रीचा व्यवहार करणाºया व्यापाºयांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्य प्रशासक मनोज थिटे यांनी दिला़