परभणी : जिंतुरात पाच व्यापाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:39 AM2018-10-10T00:39:44+5:302018-10-10T00:41:27+5:30

बंदी असतानाही प्लास्टीकचा वापर करणाºया जिंतूर शहरातील पाच व्यापाºयांवर सोमवारी कारवाई करण्यात आली.

Parbhani: Action on five merchants in Jinnah | परभणी : जिंतुरात पाच व्यापाऱ्यांवर कारवाई

परभणी : जिंतुरात पाच व्यापाऱ्यांवर कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : बंदी असतानाही प्लास्टीकचा वापर करणाºया जिंतूर शहरातील पाच व्यापाºयांवर सोमवारी कारवाई करण्यात आली.
राज्यात प्लास्टीक बंदी लागू झाली असून, शहरात प्लास्टीकचा सर्रास वापर होत असल्याने ८ आॅक्टोबर रोजी जिंतूर नगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने शहरात पाहणी केली. पाहणी केलेल्या २१ दुकानांपैकी ५ दुकानांमध्ये प्लास्टीक ग्लास, प्लेट, वाट्या व प्लास्टीकच्या पिशव्या आढळल्या. त्यामध्ये शरद लक्ष्मण चिद्रवार, गुरुकृपा प्रोव्हीजन्स, अझहर किराणा, संत गोरोबा किराणा, सचिन जनरल स्टोअर्स या पाच दुकानदारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ही कारवाई महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डॉ.मातकर, नगर अभियंता पंकज पवार, संगणक अभियंता विनोद सावंत, कार्यालयीन अधीक्षक अरुण वीर, कर निरीक्षक डी.व्ही. तळेकर, स्वच्छता निरीक्षक एस.एस. चाऊस यांच्या पथकाने केली.

Web Title: Parbhani: Action on five merchants in Jinnah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.