परभणी : खडका शिवारात पाच ट्रॅक्टरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:46 AM2018-05-06T00:46:53+5:302018-05-06T00:46:53+5:30

तालुक्यातील खडका शिवारातून अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टरवर महसूलच्या अधिकाºयांनी कारवाई केली़ या कारवाई दरम्यान तीन ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह पळ काढला असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़

Parbhani: Action on five tractors in Khadka Shivar | परभणी : खडका शिवारात पाच ट्रॅक्टरवर कारवाई

परभणी : खडका शिवारात पाच ट्रॅक्टरवर कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : तालुक्यातील खडका शिवारातून अवैधरित्या वाळुची वाहतूक करणाऱ्या पाच ट्रॅक्टरवर महसूलच्या अधिकाºयांनी कारवाई केली़ या कारवाई दरम्यान तीन ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह पळ काढला असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती़
सोनपेठ तालुका हा अवैध वाळू वाहतुकीसाठी सोयीचा असल्याने या ठिकाणाहून अनेक ट्रॅक्टर मालक, चालक अवैधरित्या वाळुचे उत्खनन करीत आहेत़ जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार ५ मे रोजी सकाळी ८़३० वाजता कान्हेगाव येथील तलाठी परमानंद जमशेटे हे खडका शिवारातील कॅनल रस्त्यावर सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गस्त घालत असताना काही ट्रॅक्टर वाळू भरून जात असल्याचे त्यांना दिसले़ जमशेटे यांनी या ट्रॅक्टर चालकांना थांबविण्याचा प्रयत्न केला़ परंतु, त्यांनी पळ काढला़ तीन ट्रॅक्टर चालक पळाले असून, एका ट्रॅक्टर चालकाला पकडण्यात आले़ त्याच्याकडे परवान्याची विचारणा केली तेव्हा तो आढळून आला नाही़ तसेच पळून जाणाºया ट्रॅक्टरचा शोध घेत असताना गावातील वाळू साठ्यावर एक नवीन ट्रॅक्टर वाळू भरत असल्याचे आढळले़ त्याच्याकडेही वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता़ त्यामुळे हे दोन्ही ट्रॅक्टर ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले़ या ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू आढळली़ तर कालव्याजवळील शेतात १५ ब्रास वाळूसाठा सापडला़ तोही जप्त करण्यात आला़ या संपूर्ण कारवाईत ३० हजार ६०० रुपयांची वाळू आढळल्याचे महसूलच्या अधिकाºयांनी सांगितले़
खबºयाचा मोबाईल घेतला ताब्यात
ही कारवाई करीत असताना एक व्यक्ती मोटारसायकलवरून (एमएच २२ एसी- ७३०१) पाठलाग करीत मोबाईलच्या सहाय्याने इतरांना माहिती देत असल्याचे आढळून आले़ अधिकाºयांनी या व्यक्तीचा मोबाईल व मोटारसायकल ताब्यात घेतली आहे़

Web Title: Parbhani: Action on five tractors in Khadka Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.