परभणी : वृक्षारोपणासह संगोपनासाठी गाव घेतले दत्तक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:49 AM2019-05-13T00:49:27+5:302019-05-13T00:49:40+5:30

सातत्याने निर्माण होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी आता पर्यावरण पूरक कामांवर भर दिला जात असून या तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले पार्डी हे गाव फक्त वृक्षारोपण करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने दत्तक घेतले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या गावात हिरवळ फुलण्याची आशा निर्माण झाली आहे.

Parbhani: Adoption of village for rearing with plantation | परभणी : वृक्षारोपणासह संगोपनासाठी गाव घेतले दत्तक

परभणी : वृक्षारोपणासह संगोपनासाठी गाव घेतले दत्तक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): सातत्याने निर्माण होणाऱ्या दुष्काळावर मात करण्यासाठी आता पर्यावरण पूरक कामांवर भर दिला जात असून या तालुक्यातील दुर्गम भागात वसलेले पार्डी हे गाव फक्त वृक्षारोपण करण्यासाठी एका सामाजिक संस्थेने दत्तक घेतले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात या गावात हिरवळ फुलण्याची आशा निर्माण झाली आहे.
ऊसतोड मजुरांचे गाव म्हणून पार्डी या गावाची ओळख आहे. परिसरामध्ये वृक्षांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे दुष्काळाचा सर्वाधिक फटका या गावाला बसतो. याच गावात पर्यावरण पूरक कामे हाती घेण्याच्या उद्देशाने श्री तुळजाभवानी प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. त्यातूनच हे गाव दत्तक घेतले असून गावात केवळ वृक्ष लागवड करणे एवढ्यापुरते मर्यादित न राहता किमान दोन वर्षे देखभाल करुन ही झाडे जोपासण्याचा निर्णय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
वृक्षारोपणासाठी गाव दत्तक घेतल्यानंतर सेलू शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांनी श्रमदानासाठी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून या गावात वृक्षारोपण केले जाणाार आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, तुळजाभवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद काष्टे, बचपन बचाव अभियानचे प्रमुख अ‍ॅड. कुमार महाजन, शशिकांत पाटील, सरपंच माऊली राठोड, रामेश्वर शेरे, शंकर चाकोते, उत्तम डोंबे, गजानन राऊत, राम मैफळ, रुपनर आदींनी गावाला भेट देऊन वृक्ष लागवडी संदर्भात पाहणी केली.
गावातील रस्त्याच्या दुतर्फा, गायरान जमीन, स्मशानभूमी, शेतकºयांच्या बांधावर अशी साडेतीन हजारहून अधिक झाडे लावली जाणार आहेत.
ही झाडे जगविण्याचा कृती आराखडा तयार केला असून माती परिक्षण करुनच योग्य त्या झाडांची लागवड केली जाणार आहे. तसेच विविध कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकºयांना पीक लागवडी संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे, असे पदाधिकाºयांनी सांगितले.
संरक्षक जाळ्या बसविणार
४पार्डी गावाच्या माळरानावर लागवड केलेल्या झाडांना ठिबक सिंचनाच्या सहाय्याने पाणी देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी झाडांना संरक्षित जाळ्या बसविल्या जाणार आहेत, अशी माहिती संस्थेच्या पदाधिकाºयांनी दिली.
४पावसाळ्यापूर्वी बैठक घेऊन वृक्षारोपण व इतर अनुषंगिक बाबींचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी सेलू शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांचीही मदत घेतली जाणार असल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Parbhani: Adoption of village for rearing with plantation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.