परभणी :९ कोटी खर्चून २४ वर्षानंतरही काम अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:58 AM2018-01-13T00:58:20+5:302018-01-13T00:59:28+5:30
जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलाचे काम ९ कोटी रुपये खर्च करून तब्बल २४ वर्षानंतरही अपूर्णच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलाचे काम ९ कोटी रुपये खर्च करून तब्बल २४ वर्षानंतरही अपूर्णच असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे़
जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथे सिरसाळा-सोनपेठ-शिर्शी राज्य मार्ग २२१ रस्त्यावर गोदावरी नदीवर पूल बांधण्याच्या कामास १८ फेब्रुवारी १९९४ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती़ त्यावेळी या पुलाच्या कामाची २ कोटी ६३ लाख ७५ हजार रुपये किंमत होती़ या अंतर्गत मुख्य पूल २६़५० मीटरचे १० गाळे व शिर्शी बाजुचे पोंच मार्ग २२६ मीटर, हटकरवाडी बाजुचे पोंच मार्ग लांबी १२७० मीटर, शिर्शी बाजु पूल मोºया २, हटकरवाडी बाजुच्या पुलाच्या ४ मोºया व संरक्षक कामे आणि अन्य काही बाबींचा या कामाच्या अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला होता़ हे काम औरंगाबाद येथील एका कंत्राटदारास देण्यात आले़ २०११ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात आले नाही़ त्यामुळे २० जुलै २०१७ रोजी या कामाला १० कोटी ४१ लाख ९४ हजार रुपयांची सुधारित प्रशासकीय मंजुरी देण्यात आली़ त्यानंतर ६ कोटी ५५ लाख ८८ हजार ३०४ रुपयांच्या कामांची निविदा काढण्यात आली़ याबाबतचा कार्यारंभ आदेश २२ फेब्रुवारी २०१३ रोजी संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला़ त्यामध्ये १८ महिन्यांत म्हणजे २१ आॅगस्ट २०१५ पर्यंत हे काम पूर्ण करणे अपेक्षित होते़ परंतु, या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेने योग्य ती खबरदारी घेतली नाही़ परिणामी हे काम रेंगाळल़े़ पुन्हा या कामाला ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली़ ही मुदतवाढ संपूनही वर्षभराचा कालावधी लोटला तरीही या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही़ त्यामुळे या पुलावरून अधिकृतपणे वाहतूक अद्याप सुरू झालेली नाही़ आतापर्यंत या पुलाच्या कामात मुख्य पुलाचे ९ स्लॅब पूर्ण झाले असून, पोंच मार्गातील पूल, मोºया, पोंच मार्ग प्रगतीत आहेत़ शेवटच्या एका स्लॅबचे काम प्रगतीपथावर आहे़ हा प्रगतीपथ कधी पूर्ण होईल? हे अद्याप निश्चित नाही़
शिवाय हे काम कधी पूर्ण करणार याबाबतचा जाबही सार्वजनिक बांधकाम विभागाला कोणी विचारत नाही़ जुलै महिन्यात जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या राज्य विधान मंडळाच्या अंदाज समितीकडे या संदर्भात ग्रामस्थांनी तक्रारी केल्या़ त्यावेळी या समितीचे अध्यक्ष आ़ उदय सामंत यांनी या तक्रारीची दखल घेऊन तातडीने कारवाई केली जाईल, असे सांगितले होते़ परंतु, सामंत यांच्या आश्वासनानंतरही तब्बल सहा महिन्यांत काहीही हलचाल झालेली नाही़ त्यामुळे प्रशासकीय उदासिनतेचा फटका या पुलाच्या कामास बसत आहे़ परिणामी या भागातील ग्रामस्थांच्या रहदारीचा प्रश्न तब्बल २४ वर्षानंतरही सुटलेला नाही.
..तर मुख्यालयाचे ३५ किमी अंतर कमी होणार
४गोदावरी नदीवरील शिर्शी येथील पुलावरून वाहतूक सुरू झाल्यास परभणीहून सोनपेठला जाण्यासाठी किंवा सोनपेठहून परभणीला येण्यासाठीचे ३५ किमीचे अंतर कमी होणार आहे़ शिवाय परभणीहून परळी, सिरसाळा, लातूरला जाण्याचे अंतरही कमी होणार आहे़ यामुळे वेळ व इंधनाची बचत होणार आहे़ सध्या परभणी ते सोनपेठ प्रवासाचे अंतर ८० कि.मी.आहे. शिवाय या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.