परभणी :...अखेर कालव्याचे पाणी केले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:01 AM2018-11-14T00:01:48+5:302018-11-14T00:02:12+5:30
शेतीसाठी करपरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुलावरील नादुरुस्तीमुळे वाया जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालव्याचे पाणी बंद केले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): शेतीसाठी करपरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुलावरील नादुरुस्तीमुळे वाया जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालव्याचे पाणी बंद केले आहे़
करपरा धरणातील पाणी शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी वापरता यावे, यासाठी कालव्याद्वारे सोडण्यात आले होते; परंतु, कालव्यावर असलेल्या पुलांची पाटबंधारे विभागाने दुरुस्ती केली नव्हती़ त्यामुळे १५ दिवसांपूर्वी पाणी सोडूनही २४ किमी पैकी केवळ १० किमी पर्यंतच पाणी पोहचले़ त्यामुळे शेतकºयांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला़ याबाबत ‘लोकमत’ने १२ नोव्हेंबर रोजीच्या अंकात ‘९० टक्के पाण्याची नासाडी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़ या वृत्ताची दखल घेत पाटबंधारे उपविभागाचे अभियंता बी़बी़ तोटावार यांनी कालव्याला सोडण्यात आलेले पाणी तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे आता पुलांची दुरुस्ती होवून शेतकºयांना चार ते पाच दिवसानंतर पाणी मिळणार आहे़ त्यामुळे शेतकºयांनी सहकार्य करावे, असे आवाहन बी़बी़ तोटावार यांनी केले आहे़
विशेष म्हणजे दुष्काळी परिस्थिती असल्याने मंत्रालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत पाणी प्रश्नावर तातडीच्या बैठका घेऊन नियोजन केले जात आहे़; परंतु, उपलब्ध पाण्याची नासाडी झाल्यामुळे करपरा धरणाच्या कालव्यावरील लाभक्षेत्रातील शेतकºयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे़ या पुढे पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे़
‘दोषींवर कार्यवाही करा’
४कालव्यावरील पुलांची दुरुस्ती न करताच करपरा धरणातील पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे जिंतूर तालुक्यातील निवळी ते वर्णा दरम्यान असलेल्या चार पुलांवरून ९० टक्के पाण्याची नासाडी झाली़ दुष्काळी परिस्थितीत पाण्याची नासाडी करणाºया शाखा अभियंत्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे़