परभणी : नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचा अर्ज मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:44 PM2019-06-17T23:44:14+5:302019-06-17T23:44:37+5:30

येथील नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जून रोजी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि भाजप पक्षाने युती करुन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पांडुरंग नितनवरे यांनी सकाळी ११.३० वाजता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात युतीचा १, आघाडीचा १ व अपक्ष १ असे ३ उमेदवार राहिल्याने तिरंगी लढत होणार आहे.

Parbhani: After the dramatic developments, Shivsena's application is back | परभणी : नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचा अर्ज मागे

परभणी : नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेनेचा अर्ज मागे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): येथील नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जून रोजी नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना आणि भाजप पक्षाने युती करुन निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पांडुरंग नितनवरे यांनी सकाळी ११.३० वाजता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात युतीचा १, आघाडीचा १ व अपक्ष १ असे ३ उमेदवार राहिल्याने तिरंगी लढत होणार आहे.
नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी कॉँग्रेस पक्षाकडून पुजा खरात, भाजपकडून प्रा. एस.एन. पाटील, शिवसेनेकडून पांडूरंग नितनवरे यांच्यासह अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांनी ६ जून रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १३ जून होती. मात्र प्रमुख पक्षाच्या उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेऊन न्यायालयात अपील दाखल झाल्याने १३ ऐवजी १७ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार सकाळी ११.३० वाजता शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग नितनवरे यांनी अपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता भाजपाचे प्रा. एस.एन. पाटील, कॉँग्रेसच्या पूजा खरात आणि अपक्ष उमेदवार रतन वडमारे यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.
दरम्यान, सध्या नगरपालिका आ. मोहन फड आणि डॉ. अंकुश लाड गटाच्या ताब्यात आहे. निवडणुकीच्या सुरुवातीलाच युती करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र यश न आल्याने आ. मोहन फड आणि डॉ. अंकुश लाड यांच्या गटाने भाजपाच्या तिकीटावर प्रा. एस.एन. पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. तर शिवसेनेकडून पांडुरंग नितनवरे यांनी अर्ज दाखल केला.
भाजप आणि सेनेचा स्वतंत्र उमेदवार दिल्याने मतविभाजन होऊन याचा फायदा कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला होऊ नये, यासाठी युती करण्याच्या हलचालीना वेग आला. शेवटी दोन्ही पक्षाने युती करीत ही जागा भाजापाला सोडण्याचा निर्णय घेतला.
याबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हास्तरीय नेत्यांना सूचना देत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश ढगे यांनी दिली. यानुसार अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १७ जून रोजी सकाळी ११.३० वाजता शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पांडूरंग नितनवरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांनीही युती झाल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
२३ जून : रोजी होणार मतदान; प्रचारासाठी चार दिवस
४मानवत नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी २३ जून रोजी मतदान होणार असून प्रचारासाठी उमेदवारांना केवळ चारच दिवस मिळाले आहेत. प्रचारासाठी वेळ कमी वेळ मिळाला आहे. या वेळेत २६ हजार १५७ मतदारांपर्यंत पोहचायचे असल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. निवडणुकीसाठी शहारात २१ मतदान केंद्र निश्चित केले आहेत.
४२४ जून रोजी तहसील कार्यालयात सकाळी आकरा वाजल्यापासून मतमोजणीला सुरवात होणार आहे. या सर्व निवडणुक प्रक्रियेसाठी २७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश ढाकणे यांनी दिली.

Web Title: Parbhani: After the dramatic developments, Shivsena's application is back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.