परभणी : वेशांतर करुन पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:33 AM2019-03-10T00:33:38+5:302019-03-10T00:34:00+5:30
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ८ मार्च रोजी कौसडी येथील आठवडी बाजारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वेशांतर करुन छापा टाकला. यात सहा जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ८ मार्च रोजी कौसडी येथील आठवडी बाजारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर वेशांतर करुन छापा टाकला. यात सहा जुगाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
कौसडी येथील आठवडी बाजारात जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना मिळाली. त्या आधारे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे व कर्मचाऱ्यांनी शेतकरी, ऊसतोड कामगार, व्यापारी, कीर्तनकार, गोंधळी असे वेश परिधान करुन एका खाजगी वाहनाने छापा टाकला. त्यावेळी गावातील आरोग्य केंद्रासमोर व मारोती मंदिरासमोरील सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याचे निदर्शनास आले. या छाप्यात रमेश रामराव मोरे, तुळशीराम बाबूराव देशमुख, साहेबराव बाबाराव देशमुख, विनोद रामचंद्र ढवळशंख, दगडू लक्ष्मणराव नागनाथ (सर्व रा.कौसडी), गजानन (मटका बुकी मालक) अशा ६ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. जुगाराच्या साहित्यासह ३ हजार १० रुपये रोख, तीन मोबाईल असा ६ हजार १० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. हवालदार शिवाजी भोसले यांच्या फिर्यादीवरुन बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, हवालदार बाळासाहेब तुपसुंदरे, हनुमंत जक्केवाड, शिवाजी भोसले, लक्ष्मीकांत धुतराज, भगवान भुसारे, सय्यद मोईन, हरि खुपसे, सय्यद मोबीन आदींनी केली.