परभणी :पीडित महिलेच्या उपोषणानंतर विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:15 AM2018-10-15T00:15:36+5:302018-10-15T00:16:10+5:30

पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेची छेड काढून, तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध पीडितीने केलेल्या उपोषणानंतर १३ आॅक्टोबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास पिंपळदरी पोलीस ठाण्यात विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Parbhani: After the victim's fast, filing a complaint of molestation, atrocity | परभणी :पीडित महिलेच्या उपोषणानंतर विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

परभणी :पीडित महिलेच्या उपोषणानंतर विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेची छेड काढून, तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध पीडितीने केलेल्या उपोषणानंतर १३ आॅक्टोबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास पिंपळदरी पोलीस ठाण्यात विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील बडवणी येथील ३० वर्षीय महिला १८ सप्टेंबर रोजी साडेदहा ते अकराच्या सुमारास गावातील सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यासाठी गेली असता वैजनाथ बारिकराव मुंडे यांनी अंधाराचा फायदा घेत पिडीत महिलेची छेड काढून तिच्या सोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने आरडाओरड केल्यानंतर नातेवाईक व ग्रामस्थ जमा होताच, जातीवाचक शिवीगाळ करून व जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने पळ काढला, अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यानंतरही पिंपळदरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही.
त्यानंतर ११ व १२ आॅक्टोबर रोजी पीडित महिलेने गंगाखेड येथील तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. त्यानंतर १३ आॅक्टोबर रोजी पहाटे दीडच्या सुमारास आरोपीविरुद्ध विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नंदलाल चौधरी हे करीत आहेत.

Web Title: Parbhani: After the victim's fast, filing a complaint of molestation, atrocity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.