परभणी : आयटकचे जेल भरो आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:34 AM2019-08-08T00:34:07+5:302019-08-08T00:34:23+5:30
अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात तात्काळ वाढ करावी, मासिक पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी/बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने बुधवारी परभणी शहरात जेल भरो आंदोलन करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात तात्काळ वाढ करावी, मासिक पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी/बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने बुधवारी परभणी शहरात जेल भरो आंदोलन करण्यात आले़
महिला व बालकल्याण विभागातील सर्वस्तरावरील रिक्त पदे भरावीत, अम्ब्रेला योजनेतील सुधारित दर लागू करावेत, टीए/डीएची थकीत रक्कम तात्काळ देण्यात यावी आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी/बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने बुधवारी दुपारच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात परभणी- वसमत या रस्त्यावर रास्ता रोको करण्यात आले़ त्यानंतर अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी या परिसरात घोषणाबाजी केली़ त्यानंतर जेल भरो आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात राज्य सरचिटणीस तथा जिल्हाध्यक्षा अॅड़ माधुरी क्षीरसागर, कॉ़ ज्योती कुलकर्णी, कॉ़ अर्चना फड, कॉ़ सीमा देशमुख, शाहेदा शेख, ताहेरा बेगम, सुरेखा गायकवाड, वर्षा चव्हाण, शमा परवीन, सलमा सिरीन, शिवशिला वाळवंटे महिला सहभागी झाल्या होत्या़
२०० अंगणवाडी सेविकांना अटक व सुटका
४अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने परभणी शहरामध्ये बुधवारी जेल भरो आंदोलन करण्यात आले़
४त्याचबरोबर रास्ता रोको करून घोषणाबाजी करण्यात आली़ या आंदोलनकर्त्यांना दुपारच्या सुमारास नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले़
४यावेळी किमान २०० अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची उपस्थिती होती़