परभणी: अमरगड पर्यटनस्थळी ३ कोटींची कामे करणार-विजय भांबळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:00 AM2019-09-10T01:00:51+5:302019-09-10T01:01:09+5:30

अमरगड हे बंजारा समाज बांधवांचे अत्यंत पवित्र ठिकाण असून, या तीर्थस्थळाच्या विकास कामांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या अंतर्गत विकास कामांना सुरुवात केली असल्याची माहिती आ़ विजय भांबळे यांनी दिली़

Parbhani: Amargad tourist will do Rs 1 crore work - Vijay Bhamble | परभणी: अमरगड पर्यटनस्थळी ३ कोटींची कामे करणार-विजय भांबळे

परभणी: अमरगड पर्यटनस्थळी ३ कोटींची कामे करणार-विजय भांबळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): अमरगड हे बंजारा समाज बांधवांचे अत्यंत पवित्र ठिकाण असून, या तीर्थस्थळाच्या विकास कामांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या अंतर्गत विकास कामांना सुरुवात केली असल्याची माहिती आ़ विजय भांबळे यांनी दिली़
जिंतूर तालुक्यातील येनोली (अमरगड) येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉ़ रामराव बापू महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त बंजारा समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी आ़ भांबळे बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर श्रीसंत शिवचरण बापू महाराज अमरगड, बी़ जालीमसिंग नाईक, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, बाळासाहेब घुगे, अभिनय राऊत, मधुकर भवाळे, विजय खिस्ते, वसंतराव राठोड, साहेबराव चव्हाण, अ‍ॅड़विनोद राठोड, सुधाकर जाधव, धर्मा राठोड आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना आ़ भांबळे म्हणाले की, अमरगडला पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याने येथे प्राथमिक सोयी, सुविधा निर्माण होऊ शकल्या़ जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांना जि़प़ अध्यक्षपदाची जबाबदारी दिली़ त्यानंतर त्या ही जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत़ त्यांचे कामकाज गौरवास्पद आहे, असेही आ़ भांबळे म्हणाले़ बंजारा समाजाच्या प्रत्येक तांडा वस्तीवर विविध योजनांच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली आहेत़ त्यामुळे बंजारा समाजबांधवांनी आ़ विजय भांबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन अ‍ॅड़ विनोद राठोड यांनी यावेळी केले़ यावेळी आ़ भांबळे यांनी जिंतूर नगरपालिकेच्या हद्दीत सभामंडपासाठी एक एकर जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले़ कार्यक्रमास संदीप राठोड, रामराव चव्हाण, पंडित जाधव, शिवाजी जाधव, नामदेव राठोड, दिलीप राठोड आदी उपस्थित होते़

Web Title: Parbhani: Amargad tourist will do Rs 1 crore work - Vijay Bhamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.