परभणी : बोंडअळीच्या धास्तीने दहा एकर कापसावर नांगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:20 AM2018-07-28T00:20:29+5:302018-07-28T00:21:06+5:30

गतवर्षी बोंडअळीच्या प्रादूर्भावाने कापसाचे अख्खे पिकच हातचे गेले होते. याहीवर्षी पुन्हा बोंडअळीने डोके वर काढले असून सेलू तालुक्यातही बोंडअळीचे पतंगे दिसून येत आहेत. त्यामुळे पीक हाती लागणार नसल्याची खात्री झाल्याने सिद्धनाथ बोरगाव येथील एका शेतकऱ्याने दहा एकरावरील कापसाच्या पिकावर शुक्रवारी नांगर फिरविण्यास सुरुवात केली.

Parbhani: Anchor at ten acres of cottage with the intricacies of bundlery | परभणी : बोंडअळीच्या धास्तीने दहा एकर कापसावर नांगर

परभणी : बोंडअळीच्या धास्तीने दहा एकर कापसावर नांगर

Next

मोहन बोराडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : गतवर्षी बोंडअळीच्या प्रादूर्भावाने कापसाचे अख्खे पिकच हातचे गेले होते. याहीवर्षी पुन्हा बोंडअळीने डोके वर काढले असून सेलू तालुक्यातही बोंडअळीचे पतंगे दिसून येत आहेत. त्यामुळे पीक हाती लागणार नसल्याची खात्री झाल्याने सिद्धनाथ बोरगाव येथील एका शेतकऱ्याने दहा एकरावरील कापसाच्या पिकावर शुक्रवारी नांगर फिरविण्यास सुरुवात केली.
परभणी जिल्ह्यामध्ये गतवर्षी खरीप हंगामातील कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. जोमात आलेले पीक बोंडअळीच्या तडाख्यात सापडल्याने अख्या पिकाचे नुकसान झाले. राज्य शासनाने बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला असला तरी कापूस लागवडीचा खर्चही त्यातून निघाला नाही. यावर्षी तरी कापसापासून रोख उत्पादन निघेल, अशी अपेक्षा होती. सेलू तालुक्यातील पिके चांगली आली असली तरी पुन्हा कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यासाठी शेतकरी औषधी फवारणी करीत आहेत. मात्र बोंडअळीचा प्रादूर्भाव कमी होत नाही. याला वैतागून तालुक्यातील सिद्धनाथ बोरगाव येथील शेतकरी दत्ता निपणे यांनी शुक्रवारी आपल्या शेतातील दहा एकरवरील कापसावर नांगर फिरविण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी १० एकरवरील क्षेत्रापैकी दीड एकरवरील कापूस उपटून टाकला आहे. चार फुटापर्यंत वाढलेल्या कापसामध्ये चार ते पाच दिवंसापासून फूल व पात्यामध्ये बोंडअळी आढळून येत होती. हे पीक हाती लागणार नाही, याची खात्री झाल्याने लिपणे यांनी हा निर्णय घेतला. जि.प.तील शिवसेनेचे गटनेते राम खराबे यांनी कृषी अधिकाºयांशी संपर्क साधून लिपणे यांना मार्गदर्शन करण्यास सांगितले.

Web Title: Parbhani: Anchor at ten acres of cottage with the intricacies of bundlery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.