परभणी : पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांची होतेय हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 12:00 AM2019-07-03T00:00:35+5:302019-07-03T00:01:33+5:30

तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मागील वर्षभरापासून औषधींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी पशुपालकांना खाजगी दुकानावरून औषधी विकत घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

Parbhani: Animal Husbandry Hospital | परभणी : पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांची होतेय हेळसांड

परभणी : पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांची होतेय हेळसांड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात मागील वर्षभरापासून औषधींचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी पशुपालकांना खाजगी दुकानावरून औषधी विकत घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पालम तालुक्यात पालम शहर, रावराजूर, पेठ शिवणी, बनवस, तांदुळवाडी व चाटोरी या सहा ठिकाणी पशूसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पशूधनाला वेळेवर उपचार मिळावा, त्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शासनाने हे दवाखाने कार्यरत केलेले आहेत; परंतु, येथील दवाखान्यात गेल्यानंतर औषधींचा तुटवडा असल्याने उपचाराविना जनावरे परतण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. उपचारासाठी लागणारे बँडेज, जखमेवर टाकावयाचे आयोडीन, मिनरल मिक्सर विविध प्रकारच्या लस, औषधींसह जनावरांच्या आजारावर उपचार करणारे इंजेक्शन उपलब्ध नाहीत. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने दवाखान्यात आलेल्या शेतकºयांचा हिरमोड होत आहे. आजारी पडलेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी शेतकरी डॉक्टरांशी वाद घालत असल्याचे प्रकार घडतात. वेळप्रसंगी नाईलाजाने शेतकºयांना खाजगी दुकानावर जाऊन औषधी विकत घ्यावी लागत आहे. मागील वर्षभरापासून पशुवैद्यकीय दवाखान्यात महत्त्वाच्या औषधींचा नेहमीच तुटवडा निर्माण होत असून वरिष्ठ अधिकारी याकडे पूर्णत: डोळेझाक करीत आहेत. सध्या सर्वत्र पेरणीचे दिवस चालू असून आजारी पडलेली जनावरे शेतकºयांच्या पेरणीत अडथळा निर्माण करीत असतात. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच ूउपचार होणे गरजेचे आहे.
सहा रुग्णालयांवर: ५५ हजार पशुधनाचा भार
४पालम तालुक्यात पालम शहर, रावराजूर, पेठ शिवणी, बनवस, तांदुळवाडी व चाटोरी या सहा ठिकाणी पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. तालुक्यात ३१ हजार ८०२ बैल, गाय, ९ हजार १७५ म्हैस, १० हजार ७८३ शेळ्या तर ३ हजार ५८५ मेंढ्या आहेत.
४ या ५५ हजार पशूधनांचा भार तालुक्यातील सहा पशूवैद्यकीय रुग्णालयावर असला तरी या रुग्णालयात औषधींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. वरिष्ठ विभागाने याकडे लक्ष देऊन या रुग्णालयांना औषधींचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.

पालम तालुक्यात सहा पशुवैद्यकीय रुग्णालये असून या ठिकाणी जनावरांवर उपचार करण्यासाठी औषधी उपलब्ध नाहीत. त्यामुळे पशुपालक शेतकºयांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देऊन दवाखान्यांमध्ये औषधींचा साठा उपलब्ध करून देण्यात यावा.
-रत्नाकर शिंदे , उपसभापती पं.स.पालम

Web Title: Parbhani: Animal Husbandry Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.