परभणी : जनावरांची पाण्यावाचून हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:53 PM2020-02-28T23:53:11+5:302020-02-28T23:53:55+5:30
शहरातील खंडोबा बाजारात दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात येणाऱ्या जनावरांची पिण्याच्या पाण्यावाचून हेळसांड होत आहे. या बाजारात असलेल्या पाण्याच्या हौदाची दुरवस्था झाली असून या हौदात पाणीच साचत नाही. परिणामी शेतकरी व व्यापाऱ्यांना आपल्या जनावरांसाठी इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागते.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील खंडोबा बाजारात दर गुरुवारी जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात येणाऱ्या जनावरांची पिण्याच्या पाण्यावाचून हेळसांड होत आहे. या बाजारात असलेल्या पाण्याच्या हौदाची दुरवस्था झाली असून या हौदात पाणीच साचत नाही. परिणामी शेतकरी व व्यापाऱ्यांना आपल्या जनावरांसाठी इतर ठिकाणाहून पाणी आणावे लागते.
जिल्ह्यातील जनावरांच्या बाजारांपैकी परभणी येथे भरणारा गुरुवारचा बाजार हा मोठा आहे. या बाजारात पाथरी, गंगाखेड, पालम, जवळा बाजार, बोरी, सोनपेठ, जिंतूर यासह इतर जिल्ह्यातून व्यापारी जनावरे खरेदी-विक्रीसाठी घेऊन येतात. गुरुवारचा बाजार जवळपास पंधरा एकरात भरतो.
बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जनावरे या ठिकाणी विक्रीस आणले जातात. यामुळे पिण्याच्या पाण्याचा हौद हा मोठा असणे आवश्यक आहे; परंतु, सद्य:स्थितीतील हौद लहान असून जागोजागी फुटला आहे. या हौदात पाणीही राहत नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून जनावरांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बहुतांश वेळा या हौदाची डागडुजी येथील व्यापाºयांनी केली आहे.
महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने या बाबीची दखल घेऊन जनावरांसाठी बांधलेला पिण्याचा पाण्याचा हौद मोठा बांधण्यात यावा, अशी मागणी शेख यासीन बागवान, मधु शिंदे, संजू रायमले, चिमाजी पिसाळ, साहेबराव कानडे, गफार अन्सारी, दिलीप चव्हाण, शेख गफार यांनी महानगरपालिकेकडे केली आहे.
कडब्याची पेंडी २५ रुपयाला
४उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. ऊन तापायला लागले आहे. आजमितीस कडब्याची पेंडी २५ रुपयाला एक या भावाने विक्री होत आहे. परभणीचा गुरुवारचा बाजार जिल्ह्यात मोठा असल्याने शासनाने या ठिकाणी जनावरांसाठी चारा छावनी उभारणीची गरज असल्याचे येथील व्यापाºयांनी सांगितले.