परभणी : सरमिसळ पद्धतीने साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 11:37 PM2019-10-09T23:37:04+5:302019-10-09T23:37:39+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ पद्धतीने नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ६ हजार ६०८ कर्मचाºयांना मतदान केंद्राध्यक्ष आणि ३ मतदान केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे़

Parbhani: Appointment of 500 employees in a simple manner | परभणी : सरमिसळ पद्धतीने साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

परभणी : सरमिसळ पद्धतीने साडेसहा हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळ पद्धतीने नियुक्ती करण्यात आली असून, एकूण ६ हजार ६०८ कर्मचाºयांना मतदान केंद्राध्यक्ष आणि ३ मतदान केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे़
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात १८ हजार २४६ कर्मचाºयांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली होती़ या कर्मचाºयांची प्रथम सरमिसळ आॅनलाईन पद्धतीने करण्यात आली़ त्यात विधानसभानिहाय ८ हजार २७० कर्मचाºयांची निवड करण्यात आली होती़ जिंतूर मतदार संघासाठी १ हजार ७४१, परभणी मतदार संघासाठी २ हजार ४१९, गंगाखेड २ हजार ३०१ आणि पाथरी विधानसभा मतदार संघासाठी १ हजार ८०९ कर्मचाºयांची नियुक्ती केली़ त्यानंतर ६ आॅक्टोबर रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर आणि मुख्य निवडणूक निरीक्षक भूपेंद्रसिंह आणि विजय केतन उपाध्याय यांच्या उपस्थितीत आॅनलाईन पद्धतीने द्वितीय सरमिसळ करण्यात आली़
यात कर्मचाºयांना विधानसभानिहाय नियुक्ती देण्यात आली आहे़ त्यामध्ये जिंतूर विधानसभा मतदार संघात ४४८ मतदान केंद्राध्यक्ष, ४४८ प्रथम मतदान अधिकारी आणि ८९६ इतर मतदान अधिकारी अशी १ हजार ७९२ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली़ परभणी मतदार संघात ३३३ मतदान केंद्र अध्यक्ष, ३३३ प्रथम मतदान अधिकारी आणि ६६६ इतर मतदान अधिकारी असे १ हजार ३३२ कर्मचाºयांना नियुक्ती देण्यात आली़ गंगाखेड मतदार संघात ४३७ मतदान केंद्र अध्यक्ष, ४३७ प्रथम मतदान अधिकारी आणि ८७४ इतर मतदान अधिकारी अशा १ हजार ७४८ तर पाथरी विधानसभा मतदार संघात ४३४ मतदान केंद्र अध्यक्ष, ४३४ प्रथम मतदान अधिकारी आणि ८६८ इतर मतदान अधिकारी अशा १ हजार ७३६ कर्मचाºयांची निवड करण्यात आली आहे़ चारही मतदारसंघांत मिळून मतदान केंद्रासाठी ६ हजार ६०८ कर्मचाºयांची निवड करण्यात आली आहे़
दीड हजार कर्मचारी पथकात
४द्वितीय सरमिसळ पद्धतीतून १ हजार ६५२ कर्मचाºयांची पथकामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे़
४त्यात जिंतूर ४४८, परभणी ३३३, गंगाखेड ४३७ आणि पाथरी विधानसभा मतदार संघात ४३४ कर्मचाºयांचा समावेश आहे़ विशेष म्हणजे निवडणूक कामासाठी एकूण ४७० महिला कर्मचाºयांचीही नियुक्ती केली आहे़
४त्यात जिंतूर व परभणी मतदार संघात प्रत्येकी १५०, गंगाखेड मतदार संघात ८० आणि पाथरी मतदार संघात ९० महिला कर्मचाºयांचा समावेश आहे़
मतदान यंत्रांचे वर्गीकरण सुरू
४परभणी : जिल्ह्यातील चारही मतदार संघासाठी रँडमायझेशन झालेल्या मतदान यंत्रांचे विधानसभानिहाय वर्गीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे़
४येथील कल्याण मंडपम्मध्ये मतदान यंत्रांचे ९ आॅक्टोबर रोजी वर्गीकरण करण्यात आले़ गुरुवारी देखील दिवसभर हे काम केले जाणार असून, त्यानंतर ११ आॅक्टोबर रोजी विधानसभा निहाय निश्चित केलेले मतदान यंत्र त्या त्या मतदारसंघात पाठविले जाणार आहेत़
४तेथून या मतदान यंत्रांचे मतदान केंद्रनिहाय वर्गीकरण होणार आहे़
रविवारी कर्मचाºयांचे द्वितीय प्रशिक्षण
४निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाºयांचे दुसरे प्रशिक्षण १३ आॅक्टोबर रोजी घेतले जाणार आहे़ जिंतूर येथे जवाहर विद्यालयात, परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात, गंगाखेड येथे कोद्री रोडवरील संत जनाबाई महाविद्यालयात तर पाथरी येथे माळीवाडा परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालयात सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत हे प्रशिक्षण होणार आहे़

Web Title: Parbhani: Appointment of 500 employees in a simple manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.