परभणी : निवडणुकीचे काम करणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:22 AM2020-01-22T00:22:20+5:302020-01-22T00:22:55+5:30
बीएलओ व अन्य निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शनिवारी प्रभारी जिल्हाधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी काढले आहेत़ त्यामुळे या कामातून जि़प़ कर्मचाºयांची सुटका झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बीएलओ व अन्य निवडणुकीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द करण्याचे आदेश शनिवारी प्रभारी जिल्हाधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी काढले आहेत़ त्यामुळे या कामातून जि़प़ कर्मचाºयांची सुटका झाली आहे़
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनीच जि़प़ कर्मचाºयांच्या बीएलओ म्हणून व इतर निवडणूक कामासाठी करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी १० जानेवारी रोजी जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांच्याकडे केली होती़ त्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर हे १३ जानेवारीपासून रजेवर गेले आहेत़ त्यांचा पदभार सीईओ पृथ्वीराज यांच्याकडेच देण्यात आला आहे़ त्यामुळे त्यांनीच जिल्हा परिषदेतून काढलेल्या पत्राचा संदर्भ देऊन निवडणूक कामासाठी बीएलओ व अन्य कामासाठी घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या नियुक्त्या रद्द कराव्यात व त्या ऐवजी इतर राज्य शासकीय कर्मचाºयांची बीएलओ आणि इतर कामांसाठी नियुक्ती करून अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेश सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी आणि तहसीलदार तथा सहायक मतदान नोंदणी अधिकारी यांच्या नावे काढले आहेत़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांची निवडणुकीच्या कामातून सुटका झाली आहे़
विशेष म्हणजे या कामातून सुटका करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांकडून करण्यात येत होती़ त्यांची मागणी स्वत:च जि़प़च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांचा प्रभारी पदभार आल्यानंतर पूर्ण केली आहे़ त्यामुळे जि.प.च्या कर्मचाºयांमधून समाधान व्यक्त होत आहे.
बीएलओंची जिल्हाधिकाºयांनी घेतली बैठक
४मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यातील बीएलओंची बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली़ प्रभारी जिल्हाधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी यावेळी बीएलओंकडून कामांचा आढावा घेतला़
४२६ जानेवारीपर्यंत हा कार्यक्रम राबविला जाणार असून, परभणी, गंगाखेड या तालुक्यांचे काम कमी असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना बीएलओंना दिल्या़ तसेच इतर आवश्यक सूचनाही त्यांनी यावेळी केल्या़ या बैठकीस निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे यांचीही उपस्थिती होती़