परभणी : दीड कोटीच्या ५ रस्ता कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 11:55 PM2019-03-05T23:55:28+5:302019-03-05T23:55:56+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत १ कोटी ६४ लाख ९५ हजार ७०७ रुपयांच्या ५ रस्त्यांच्या कामाच्या निविदांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला़ आगामी आचारसंहिता लक्षात घेता या संदर्भातील निविदेची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात येणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत १ कोटी ६४ लाख ९५ हजार ७०७ रुपयांच्या ५ रस्त्यांच्या कामाच्या निविदांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला़ आगामी आचारसंहिता लक्षात घेता या संदर्भातील निविदेची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात येणार आहे़
जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जि़प़ सभागृहात मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी जि़प़ सीईओ बी़पी़ पृथ्वीराज, जि़प़ उपाध्यक्षा भावनाताई नखाते व समितीचे सदस्य आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ यावेळी प्रजिमा ३३ ते कौसडी ते गोंधळा ग्रामीण मार्ग या जिंतूर तालुक्यातील रस्त्याच्या ३३ लाख ६४ हजार ७०८ रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली़ तसेच गंगाखेड तालुक्यातील सुप्पा-बोर्डा रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ३१ लाख १४ हजार २९० रुपयांच्या निविदा दरास मंजुरी देण्यात आली़ तसेच प्रजिमा ३३ पासून लिंबाळा रस्ता, पुलमोरी बांधकाम व रस्त्याची सुधारणा करण्याच्या ३४ लाख १६ हजार १७६ रुपयांच्या निविदा दरास मंजुरी देण्यात आली़ जिंतूर तालुक्यातील बेलखेडा जोड रस्ता पूल, मोऱ्या बांधकाम करणे व रस्त्यांची सुधारणा करणे या ३२ लाख ५९ हजार ९८३ रुपयांच्या रस्त्याच्या कामाच्या निविदेस मंजुरी देण्यात आली़ तसेच अंगलगाव ते किन्ही पाटीपासून मुरूमखेडा रस्त्याची सुधारण करणे व पुलमोरी बांधकाम करणे या कामासाठी ३३ लाख ४० हजार ५५० रुपयांच्या निविदा दरास मंजुरी देण्यात आली़ याशिवाय गंगाखेड तालुक्यातील इरळद येथे लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने ३० लाख १७ हजार ६१४ रुपये खर्च करून तयार करण्यात येणाºया कोल्हापुरी बंधाºयाच्या कामास मंजुरी देण्यात आली़ तसेच सोनपेठ तालुक्यातील कोरटेक येथेही ४८ लाख ५१ हजार २६० रुपये अंदाजपत्रकीय दराच्या कोल्हापुरी बंधाºयाच्या कामास मंजुरी देण्यात आली़ यावेळी अन्य काही विषयांवरही चर्चा करण्यात आली़