परभणी : तीन ग्रामपंचायत इमारत बांधकामास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 12:08 AM2018-08-05T00:08:50+5:302018-08-05T00:09:55+5:30

जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाहीत, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना मंजुरी देण्यात आली आहे़

Parbhani: Approval of construction of three Gram Panchayat building | परभणी : तीन ग्रामपंचायत इमारत बांधकामास मंजुरी

परभणी : तीन ग्रामपंचायत इमारत बांधकामास मंजुरी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाहीत, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना मंजुरी देण्यात आली आहे़
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत १ हजारांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या व स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नसलेल्या राज्यातील ५४ ग्रामपंचायतींना स्वत:चे कार्यालय बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे़ यामध्ये परभणी तालुक्यातील वडगावतर्फे पेडगाव, शिर्शी बु़ तर जिंतूर तालुक्यातील सोन्ना या तीन ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत उभारणीसाठी या योजनेंतर्गत मंजुरी देण्यात आल्याचा आदेश ग्रामविकास विभागाच्या वतीने ३ आॅगस्ट रोजी काढण्यात आला़
या ग्रामपंचायतींनी प्रथम ग्रामसभेचा ठराव घेऊन शासनाने निश्चित केलेल्या बांधकाम मूल्यांच्या १० टक्के रक्कम स्वनिधीतून भरावी लागणार आहे़ या इमारतीच्या बांधकामासाठी अंतीम मंजुरी ही जिल्हा परिषद देणार आहे़ त्यामुळे या तीन ग्रामपंचायतींच्या इमारतींचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे दिसत आहे़
हिंगोली जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींचा समावेश
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत ग्रामविकास विभागाने राज्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या इमारतीच्या बांधकामास मंजुरी दिली आहे़ यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १, नांदेड २, जालना १, परभणी ३ तर सर्वाधिक हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यातील नांदखेडा, चिमेगाव, काठोडा, वगरवाडी तांडा, बेलूरा या पाच ग्रामपंचायतींचा समावेश आहे़

Web Title: Parbhani: Approval of construction of three Gram Panchayat building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.