परभणी : टंचाई निवारणासाठी ३४ लाखांच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:47 AM2019-07-22T00:47:55+5:302019-07-22T00:48:18+5:30

पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमधील पाणीटंचाई कायम आहे़ या गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांच्या कामांना जून महिन्यात मंजुरी दिली आहे़ ही कामे तातडीने पूर्ण झाली तर ग्रामीण भागातील पाणीटंचाई निकाली निघू शकते़

Parbhani: Approval of works of 34 lakhs for scarcity reduction | परभणी : टंचाई निवारणासाठी ३४ लाखांच्या कामांना मंजुरी

परभणी : टंचाई निवारणासाठी ३४ लाखांच्या कामांना मंजुरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पावसाने पाठ फिरविल्यामुळे जिल्ह्यात अनेक गावांमधील पाणीटंचाई कायम आहे़ या गावांमधील पाणीटंचाई निवारणाची कामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांच्या कामांना जून महिन्यात मंजुरी दिली आहे़ ही कामे तातडीने पूर्ण झाली तर ग्रामीण भागातील पाणीटंचाई निकाली निघू शकते़
यावर्षी जिल्ह्यामध्ये आॅक्टोबर महिन्यापासून पाणीटंचाईने डोके वर काढल्याने ग्रामीण भाग टंचाईच्या समस्येने होरपळून निघाला होता़ टंचाईग्रस्त भागास पाणीपुरवठा करण्यासाठी यावर्षी प्रथमच जिल्हा प्रशासनाने नऊ महिन्यांचा टंचाई कृती आराखडा तयार केला होता़ जून अखेरपर्यंत प्रशासनाला पाणीटंचाईच्या कामांवर भर द्यावा लागला़ पावसाचे वेळेत आगमन झाले नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीतही फारशी वाढ झाली नसल्याने अनेक गावांत टंचाईचे संकट कायम आह़े़ जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईच्या कामांसाठी दोन वेळा मुदत वाढ दिली आहे़ त्यानुसार ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई निवारणाची कामे हाती घेतली जाणार आहेत़ जून महिन्यापासून पावसाळ्याला प्रारंभ होतो़ मात्र संपूर्ण जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत ६० टक्केच पाऊस झाला़ परिणामी टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला उपाययोजना कराव्या लागल्या़
जून महिन्यात जिल्हा प्रशासनाने तात्पुरत्या पूरक नळ योजना आणि विशेष नळ योजना दुरुस्तीच्या ९ कामांना मंजुरी दिली आहे़
एकूण ३४ लाख ५७ हजार ४४० रुपयांची ही कामे असून, जिल्ह्यात टंचाई जाणवणाऱ्या भागात या कामांच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ परभणी तालुक्यातील भोगाव येथे १ लाख ६८ हजार ६०० रुपये खर्चाच्या नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामाला ११ जून रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली़ तसेच पेडगाव येथील २ लाख ६० हजार रुपये, सिंगणापूर येथील १ लाख ७८ हजार २०० रुपये, इस्माईलपूर येथील १ लाख ७ हजार २००, नांदापूर येथील १ लाख ३१ हजार ४०० रुपयांच्या कामांना जून महिन्यामध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़ त्याचप्रमाणे पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे ६ लाख ३१ हजार ४०० रुपये खर्चाच्या तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या कामाला ९ जून रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़ याच तालुक्यातील गौर येथे पाणीटंचाई निर्माण झाल्याने १५ लाख ६९ हजार ४४० रुपये खर्चाच्या तात्पुरत्या पूरक नळ योजनेच्या कामाला जिल्हा प्रशासनाने १२ जून रोजी मंजुरी दिली आहे तर मुंबर येथे २ लाख ४८ हजार ८०० रुपये खर्चाच्या कामालाही १५ जून रोजी मंजुरी देण्यात आली आहे़ पूर्णा तालुक्यातील वाईलासिना येथे ३ लाख ८ हजार २०० रुपये खर्चाच्या नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामाला १५ जून रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे़
जून महिन्यात शक्यतो पाणीटंचाई शिथील होते़ मात्र यावर्षी पाऊस झाला नसल्याने जून महिन्यातही टंचाई निवारणाची कामे हाती घ्यावी लागली आहेत़ विशेष म्हणजे, जुलै महिना अर्धा सरला तरी पाऊस नसल्याने जिल्हा प्रशासनातील महसूल विभाग अजूनही पाणीटंचाई निवारणाचीच कामे प्राधान्याने करीत आहे़ त्यावरून जिल्ह्यातील पाणी टंचाईचे संकट किती गंभीर आहे, हे दिसून येत आहे़
१०० गावांमध्ये टंचाई निवारणाची कामे
४जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील १०९ गावांमध्ये प्रशासनाने नळ योजनांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत़ या कामांपैकी अनेक कामे पूर्णही झाली आहेत़ त्यामुळे अनेक गावांमधील पाणीटंचाई शिथील झाली असली तरी संपूर्ण उन्हाळ्यात नळ योजना दुरुस्तीच्या कामांमधून प्रशासनाने पाणीटंचाई निवारणाचा प्रयत्न केला आहे़
४सेलू तालुक्यातील १३, मानवत तालुक्यातील १२, पालम तालुक्यातील ६, पाथरी तालुक्यातील ६, जिंतूर तालुक्यातील ११, गंगाखेड तालुक्यातील ६, सोनपेठ तालुक्यातील २, परभणी तालुक्यातील १८, पूर्णा तालुक्यातील ६ अशा १०९ गावांमध्ये आतापर्यंत तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा योजना आणि नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीची कामे जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहेत़
पावसाची प्रतीक्षा कायम
४जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत असला तरी हा पाऊस समाधानकारक नाही़ या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे़ परंतु, भूजल पातळीत वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे़
४जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक असून, या प्रकल्पात पाणीसाठा जमा होण्यासाठी वाहवणी पाऊस होणे आवश्यक आहे़
४सध्या होत असलेला पाऊस अल्प स्वरुपाचा असून, या पावसामुळे जमिनीतील पाणी पातळीतही वाढ होत नसल्याने जिल्हावासियांना मोठ्या दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे़

Web Title: Parbhani: Approval of works of 34 lakhs for scarcity reduction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.