परभणी : घरावर पेट्रोल टाकणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:25 PM2019-06-05T23:25:28+5:302019-06-05T23:25:55+5:30
तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी यांच्या घरावर पेट्रोल हल्ला करणाºया आरोपीला जिंंतूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस जिंतूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी यांच्या घरावर पेट्रोल हल्ला करणाºया आरोपीला जिंंतूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीस जिंतूर न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रशांत मुळी व प्रवीण मुळी यांच्या घरावर २७ मे रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास पेट्रोल टाकून आग लावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला होता. पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जात या प्रकरणाशी संबंधित असणाºया अनिल देविदास वाकळे यास ताब्यात घेतले. या आरोपीला जिंतूर न्यायालयासमोर हजर केले असता ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, संशयित आरोपी हा अट्टल गुन्हेगार असून यापूर्वी अनेक चोºया केल्याने विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत. घटनेच्या अनुषंगाने अनिल वाकळे याने येलदरी येथील मारोती मंदिरातील साऊंड सिस्टीम चोरी केली होती. ही घटना प्रवीण मुळी यांनी उजेडात आणली होती. त्याच बरोबर यापूर्वीही येलदरी येथील एका मोठ्या चोरीच्या प्रकरणात मुळी यांना इतंभूत माहिती असल्याने त्याचा बदला म्हणून संबंधिताने हे कृत्य केले असावे, असा अंदाज आहे. तसेच मुळी यांच्या घरी ३ जून रोजी मागच्या दाराने पुन्हा दगडफेक झाली. दगडफेक करीत असताना आरोपीने अंधाराचा फायदा घेऊन पलायन केले होते. मात्र काही व्यक्तींनी अनिल वाकळे हा रात्रीच्या वेळी घरी जाताना पाहिले होेते. त्यानंतर मुळी यांचा संशय पक्का झाला. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळताच त्यांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला. नेमका आरोपी कोण? हे पोलिसांना माहितीच नव्हते. म्हणून पोलिसांनी आरोपीलाच अनिल वाकळे कुठे राहतो? याची विचारपूस केली. त्यानंतर आरोपी पोलिसांना गुंगारा देत निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी गावातील एका महिलेला आरोपीची माहिती विचारली. तेव्हा तुमच्या सोबत असलेलाच अनिल वाकळे हा आरोपी आहे, असे म्हणताच पोलिसही भांबावले. तोपर्यंत अनिल वाकळे हा गावापासून सेनगाव तालुक्यातील साखरा गावाच्या दिशेने २० कि.मी. दूर गेला होता. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत त्यास पकडले. ४ जून रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सोनाजी आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एल.शेख, पोलीस शिपाई पी.एस. तूपसुंदर, राजेश सरोदे, व्यंकटेश नरवाडे आदींनी केली आहे.