परभणीत आशा वर्कर्सचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:37 AM2019-09-14T00:37:28+5:302019-09-14T00:39:31+5:30
आशा वर्कर, गट प्रवर्तकांच्या मानधनात तात्काळ वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आशा वर्कर, गट प्रवर्तकांच्या मानधनात तात्काळ वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी १३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
राज्य शासन तिप्पट मनधन वाढीचा अद्यादेश काढण्यासाठी व फिक्स मानधन देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने तात्काळ मानधन वाढीच्या बाबतीत ठोस निर्णय घ्यावा. त्याच बरोबर आंध्रप्रदेश सरकारच्या धर्तीवर आशा वर्करला १० हजार रुपये व गट प्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, कायमस्वरुपी वेतनश्रेणी लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी शुक्रवारी आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर मुगाजी बुरुड, अनुराधा पौळ, एस.एम.स्वामी, बाबाराव आवरगंड यांच्यासह आशा वर्कर व गटप्रवर्तक सहभागी झाले होते.