परभणी : ढगाळ वातावरणामुळे खगोलप्रेमींचा हिरमोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 12:31 AM2019-12-27T00:31:45+5:302019-12-27T00:32:00+5:30
गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने शहरातील खगोलप्रेमींना सूर्यग्रहणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला नाही. खगोलप्रेमींसह विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहणाच्या निरीक्षणासाठी जोरदार तयारी केली होती; मात्र ढगाळ वातावरणामुळे ग्रहणाच्या नोंदी टिपता आल्या नाहीत. असे असले तरी शाळा, महाविद्यालयांमधून इतर ठिकाणच्या सूर्यग्रहणाचे प्रेक्षपण दाखवून ग्रहणाची माहिती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने शहरातील खगोलप्रेमींना सूर्यग्रहणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला नाही. खगोलप्रेमींसह विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहणाच्या निरीक्षणासाठी जोरदार तयारी केली होती; मात्र ढगाळ वातावरणामुळे ग्रहणाच्या नोंदी टिपता आल्या नाहीत. असे असले तरी शाळा, महाविद्यालयांमधून इतर ठिकाणच्या सूर्यग्रहणाचे प्रेक्षपण दाखवून ग्रहणाची माहिती देण्यात आली.
आठ वर्षानंतर सूर्यग्रहण अनुभवण्याची संधी प्राप्त झाल्याने जिल्ह्यात खगोलप्रेमींसह शाळा, महाविद्यालयांमधून ग्रहणाच्या नोंदी घेण्याची तयारी केली. जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ३१०० मायलर सौर चष्मेही उपलब्ध केले होते. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी सूर्यग्रहणाच्या नोंदीसाठी शाळेच्या वेळेत बदल केला होता. लायन्स क्लब परभणी, अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण दाखविण्याची सुविधा उपलब्ध केली होती. त्यामुळे सकाळी ८ वाजेपासून विद्यार्थी व खगोलप्रेमींनी महाविद्यालय परिसरात गर्दी केली होती. मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झालेच नाही. परिणामी सूर्यग्रहणाच्या नोंदीही टिपता आल्या नाहीत.
मोबाईलवर दाखविले ग्रहण
जिंतूर तालुक्यातील वस्सा येथे ढगाळ वातावरणामुळे प्रत्यक्ष सूर्यग्रहण न दिसल्याने विद्यार्थ्यांना मोबाईलवर सूर्यग्रहण दाखविण्यात आले. याकामी मुख्याध्यापक भास्कर दराडे, तुकाराम कांबळे, लक्ष्मण बकरे, के.एस.राठोड, सुभाष मांडे, मीरा जारे, कृष्णा राऊत आदींनी प्रयत्न केले.
केरळातील ग्रहण प्रत्यक्ष अनुभवले
४दक्षिण भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार असल्याने परभणी जिल्हा अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ५३ सदस्य मंगळवारीच केरळातील बेकाल फोर्ट येथे रवाना झाले होते. या सदस्यांनी कंकणाकृती सूर्यग्रहणाचे थेट प्रेक्षपण यूट्युबच्या सहाय्याने परभणीतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिले. शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात प्रोजेक्टरवर केरळमधील कंकणाकृती सूर्यग्रहण विद्यार्थी, खगोलप्रेमींना दाखविण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.बी.यु. जाधव, शिक्षणाधिकारी डॉ.वंदना वाव्हुळ, डॉ.सूचिता पाटेकर, डॉ.श्रीकांत मणियार, प्राचार्य प्रिया ठाकूर, डॉ.देवयानी शिंदे, विष्णू नवपुते, दिनेश दयाळ आदी उपस्थित होते.
अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचा उपक्रम
४केरळ येथील कंकणाकृती सूर्यग्रहणाचे लाईव्ह प्रक्षेपण परभणीतील विद्यार्थ्यांना पाहता यावे, यासाठी अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.
४या कामी सोसायटीचे अध्यक्ष डॉ.रामेश्वर नाईक, डॉ.पी.आर. पाटील, सुधीर सोनूनकर, ओम तलरेजा, प्रसाद वाघमारे, रणजीत लाड, अशोक लाड, मोहन लोहट, किरण बकान, रामभाऊ जाधव, विनोद मुलगीर, ज्ञानराज खटींग, गजानन चापके, विठ्ठल शिसोदिया, किरण कच्छवे, प्रेरणा बायस, वेदप्रकाश आर्य, डॉ.विजयकिरण नरवाडे आदींनी प्रयत्न केले.