परभणी : पाच भंगार विक्रेत्यांविरूद्ध एटीएसने दाखल केले गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:24 AM2019-08-20T00:24:10+5:302019-08-20T00:24:48+5:30

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भंगार साहित्याच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी न ठेवणाºया शहरातील ५ भंगार विक्रेत्यांविरुद्ध दहशतवाद विरोधी पथकाने गुन्हे दाखल केले आहेत़

Parbhani: ATS lodges crime against five scrap vendors | परभणी : पाच भंगार विक्रेत्यांविरूद्ध एटीएसने दाखल केले गुन्हे

परभणी : पाच भंगार विक्रेत्यांविरूद्ध एटीएसने दाखल केले गुन्हे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार भंगार साहित्याच्या खरेदी-विक्रीच्या नोंदी न ठेवणाºया शहरातील ५ भंगार विक्रेत्यांविरुद्ध दहशतवाद विरोधी पथकाने गुन्हे दाखल केले आहेत़
पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील नेट कॅफे, लॉज, भंगार विक्रेते यांच्या तपासण्या दहशतवाद विरोधी पथकाकडून केल्या जात आहेत़ राष्ट्रविघातक, सामाजिक घातक कृत्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घरमालक, भाडेकरू, लॉज मालक, सायबर कॅफे मालक, मोबाईल सीम विक्रेते, भंगार विक्रेते, आॅफसेट चालक, विस्फोटक गोदाम परवानाधारक यांना दररोज रजिस्टरमध्ये नोंदी करण्याचे बंधन घातले आहे़ त्यानुसार दररोज नोंदी करणे आवश्यक आहे़ भंगार विक्रेत्यांनी त्यांच्या स्क्रॅब दुकानात आलेला माल, कोणता माल आला, कोणी दिला तसेच हा माल विक्री केल्यानंतर तो कुठे विक्री केला? याच्या नोंदी ठेवणे आवश्यक आहे़ वारंवार सूचना देऊनही या नोंदी न ठेवल्याने दहशतवाद विरोधी पथकाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून ताज स्क्रॅब सेंटर, एचकेजीएन स्क्रॅब सेंटरच्या मालकांविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात आणि रियाज स्क्रॅब सेंटरचे मालक रियाज अहमद, बिलाल स्क्रॅब सेंटरचे मालक मो़ अकबर अली व बाबा डिस्पोजल स्क्रॅब सेंटरच्या मालकाविरूद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत़ ही कारवाई दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक शेख इब्राहीम, भारत नलावडे, दत्तात्रय चिंचाणे, अजहर पटेल, आरेफ कुरेशी, दीपक मुदीराज यांनी केली आहे़

Web Title: Parbhani: ATS lodges crime against five scrap vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.