परभणी : गायीची मिरवणूक काढून अधिकाऱ्यांचा नोंदवला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:18 AM2019-07-23T00:18:43+5:302019-07-23T00:19:13+5:30
दुधातील प्रोटीनच्या तपासणीत अधिकारी अडवणूक करीत असल्याने तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी २२ जुलै रोजी गायीची वाजत गाजत मिरवणूक काढून शासकीय दूध डेअरीतील अधिकाºयांच्या धोरणाचा निषेध नोंदविला़
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : दुधातील प्रोटीनच्या तपासणीत अधिकारी अडवणूक करीत असल्याने तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी २२ जुलै रोजी गायीची वाजत गाजत मिरवणूक काढून शासकीय दूध डेअरीतील अधिकाºयांच्या धोरणाचा निषेध नोंदविला़
येथील शासकीय दूध डेअरीवर शेतकºयांनी विक्रीसाठी आणलेल्या दुधातील प्रोटीनचे प्रमाण कमी दाखवून ते दूध परत करण्याचा प्रकार मागील काही महिन्यांपासून वारंवार घडत असल्याने दूध उत्पादक शेतकरी त्रस्त झाले होते़ राज्य शासनाकडून खरेदी करण्यात येणाºया दुधाचे मागील तीन महिन्यांपासून पैसे मिळाले नसताना दुधातील प्रोटीनच्या नावाखाली दूध उत्पादकांची अडवणूक केली जात होती़ त्यातच दुष्काळी परिस्थिती आणि अधिकाºयांच्या उदासिन धोरणामुळे तालुक्यातील दूध उत्पादक आणि दूध संस्था चांगल्याच अडचणीत आल्या आहेत़
दूध केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचारी राबवित असलेल्या धोरणामुळे दुधाचा व्यवसाय मोडीत काढत असल्याचा आरोपही शेतकºयांमधून केला जात आहे़ प्रोटीनचे चुकीचे प्रमाण दाखवून किंवा इतर कारणांमुळे शेतकºयांनी आणलेले दूध वारंवार परत करण्याचा प्रकार तालुक्यात घडत होता़ या सर्व प्रकाराविरुद्ध २२ जुलै रोजी पाथरी येथील रणवीर भाले पाटील या शेतकºयाने दूध देणाºया गायीची वाजत गाजत मिरवणूक काढली़ बैलगाडी आणि गायी बाजार समितीच्या शासकीय दूध संकलन केंद्रावर आणल्या़ त्यानंतर केंद्रावर उपस्थित असलेल्या अधिकाºयांकडून गायीचे दूध काढण्यात आले़ प्रोटीनचे प्रमाण १७ येत असल्याने दूध नाकारणाºया अधिकाºयांना प्रत्यक्ष केंद्रावर दूध काढल्यानंतर दुधातील प्रोटीनचे प्रमाण १५ असल्याचे निदर्शनास आले़ शेतकºयांचा दबाव वाढल्याने अखेर सोमवारी अधिकाºयांनी दुधाची खरेदी केली़
दूध व्यवसाय मोडीत काढण्याचा प्रकार
४गायीच्या दुधामध्ये प्रोटीनचे प्रमाण १७ एवढे असेल तरच दूध खरेदी करावे, असे शासनाचे आदेश आहेत़ मात्र या भागातील गायींच्या दुधामध्ये १५ पेक्षा अधिक प्रोटीन मिळत नाही़ त्यामुळे दूध खरेदी केले जात नाही़
४या प्रकारामुळे पाथरी तालुक्यात वाढलेला दूध व्यवसाय मोडीत काढण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याचा आरोप दूध संस्थेचे बाभळगाव येथील विठ्ठल गिराम, पाथरगाव येथील पप्पू घांडगे यांनी केला़
पथक गेले थेट शेतावऱ़़
४पाथरी येथील दूध संकलन केंद्रात काढलेल्या दुधामध्ये प्रोटीनचे प्रमाण १५ एवढे आल्यानंतर मुंबई येथील के़जी़ शिंदे, ए़जी़ पठाण, केंद्रप्रमुख शेख, आऱ आऱ मुंगळे, ए़पी़ गोटे, ए़ई़ मोरे, एऩपी़ डाके आदींनी रणवीर भाले यांच्या शेतात जाऊन गायीचे दूध काढले़ त्यावेळी या दूधात प्रोटीनचे प्रमाण १४ एवढे भरले़