परभणी: आठ वर्षांतून एकदाच गाठली पावसाने सरासरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:28 AM2019-07-17T00:28:34+5:302019-07-17T00:28:40+5:30

तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत असून असमतोलही वाढत असल्याचे मागील आठ वर्षांच्या पर्जन्यमानाची आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आठ वर्षांत केवळ एकदाच पावसाने सरासरी गाठली असून तालुक्यातील दुधना प्रकल्पात शिल्लक असलेल्या पाण्यावर शहरवासियांची मदार अवलंबून आहे.

Parbhani: The average rainfall received once in eight years is average | परभणी: आठ वर्षांतून एकदाच गाठली पावसाने सरासरी

परभणी: आठ वर्षांतून एकदाच गाठली पावसाने सरासरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी होत असून असमतोलही वाढत असल्याचे मागील आठ वर्षांच्या पर्जन्यमानाची आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आठ वर्षांत केवळ एकदाच पावसाने सरासरी गाठली असून तालुक्यातील दुधना प्रकल्पात शिल्लक असलेल्या पाण्यावर शहरवासियांची मदार अवलंबून आहे.
सेलू तालुक्यात सुपीक जमीन आहे. तसेच दुधना, कसुरा आणि करपरा या प्रमुख तीन नद्या वाहतात. त्यामुळे खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांच्या उत्पन्नावर शेतीचे बजेट अवलंबून आहे. सिंचनाची अपुरी व्यवस्था असल्याने पावसाच्या पाण्यावर शेतकऱ्यांना पिके घ्यावी लागतात. मात्र मागील आठ वर्षांपासून पावसाचा असमतोल आणि पर्जन्य दिवसात कमालीची घट झाल्याने चिंता वाढली आहे.
सेलू तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी ८१६.७० मि.मी. एवढी आहे. मागील आठ वर्षांत २०१३ या वर्षी ९१५.०४ मि.मी. सरासरी पाऊस झाला होता. हा अपवाद वगळता गेल्या आठ वर्षात एकदाही पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे या आकडेवारीवरून तालुक्यातील पर्जन्यमानावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या हाती काय उत्पन्न लागले असेल आणि त्याची आर्थिक अवस्था कशी असेल, याचा अंदाज येतो. यावर्षीही जुलैपर्यंत केवळ ३०.६० मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाही शेतकºयांच्या नशिबी दुष्काळी परिस्थिती निर्माण होती काय? अशी भिती व्यक्त होत आहे. २०१४ पासून निम्न दुधना प्रकल्पात पाणी आडविण्यात येत आहे. परतीच्या पावसाने दोन वर्षांपूर्वी प्रकल्पात समाधानकारक पाणी साठा झाला होता. त्यावर सलग दोन वर्षे सेलू, परतूर, मंठा, परभणी, पूर्णा आणि नांदेड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दुधना प्रकल्पातील पाण्याचा वापर करण्यात आला. तसेच रब्बी हंगामातील पिकांसाठी आणि जनावरांच्या चाºयासाठीही दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.
जून महिन्यात दुधना प्रकल्पाच्या मृत साठ्यातून परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १६ दलघमी पाणी सोडल्यामुळे सेलू शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सद्यस्थितीत आठ दिवसातून एकदा शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आले. तालुक्यातील देऊळगाव, वालूर, चिकलठाणा, सेलू, कुपटा या पाच महसूल मंडळातील पावसाच्या सरासरीची नोंद घेण्यात येते. दरम्यान, दरवर्षी कमी होत असलेल्या पावसामुळे शेती व्यवसाय कोलमडून पडला असून पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
आठ वर्षातील : पावसाची सरासरी (मि.मी.मध्ये)
२०११ - ६३५
२०१२ - ६१६.०४
२०१३ - ९१५.०४
२०१४ - ३५४.७८
२०१५ - ४२९.१२
२०१६ - ७४३.४२
२०१७ - ६००
२०१८ - ४५८

Web Title: Parbhani: The average rainfall received once in eight years is average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.