परभणी : दुसऱ्या हप्त्याची रक्कम बँकांकडून वाटप करण्यास होतेय टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:20 PM2019-06-05T23:20:00+5:302019-06-05T23:20:22+5:30
साखर कारखान्यांकडूून दुसºया हप्त्यापोटी देण्यात येणारी रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. मात्र बँकांकडून ही रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): साखर कारखान्यांकडूून दुसºया हप्त्यापोटी देण्यात येणारी रक्कम बँकेत जमा करण्यात आली आहे. मात्र बँकांकडून ही रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने शेतकºयांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पूर्णा तालुक्यात ऊस उत्पादक शेतकºयांची संख्या मोठी आहे. या तालुक्यात वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना, गंगाखेड येथील गंगाखेड शुगर, पूर्णा येथील बळीराजा साखर कारखाना व भाऊराव सहकारी साखर कारखान्याला यावर्षी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ऊस गेला आहे. कारखानदारांनी उसाचे पैसे दोन ते तीन टप्प्यात देण्याचे ठरविले आहे. वसमत येथील सहकारी कारखान्याने यावर्षी उसाला २ हजार १७५ रुपयांचा भाव दिला होता. यापैकी पहिला हप्ता १८७० रुपयांचा शेतकºयांना मिळाला. तर दुसºया हप्त्यापोटी प्रतीटन ३२० रुपये कारखान्याकडून मध्यवर्ती बँक शाखेकडे टप्या-टप्याने जमा करण्यात येत आहेत. काही शेतकºयांची उसाचे जमा झालेली दुसºया हप्त्याची रक्कमही कामी येईल, या उद्देशाने ते पैसे काढण्यासाठी शेतकरी बँकेत गर्दी करीत आहेत. मात्र बँकेत पैसे वेळेवर मिळत नसल्याने शेतकºयांची गैरसोय होत आहे. बँकेत पैशांचा तुटवडा आहे. बहुतांश वेळा सर्व्हर बंद पडले आहे, हे कारणे पुढे केले जात आहे. त्यामुळे शेतकºयांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.