परभणी : अधिकाऱ्यांच्या टेबलावर फेकली खराब फळे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 01:18 AM2020-02-06T01:18:31+5:302020-02-06T01:19:17+5:30

येथील जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर नुकसानग्रस्त फळे टाकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले आहे़

Parbhani: Bad fruits thrown at officers' tables! | परभणी : अधिकाऱ्यांच्या टेबलावर फेकली खराब फळे !

परभणी : अधिकाऱ्यांच्या टेबलावर फेकली खराब फळे !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर नुकसानग्रस्त फळे टाकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ५ फेब्रुवारी रोजी आंदोलन केले आहे़
१ फेब्रुवारी रोजी रात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह पाऊस झाला़ या पावसामुळे संत्रा या फळपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे़ नुकसानी संदर्भात शेतकºयांनी २ फेब्रुवारी रोजी तक्रारीही दाखल केल्या आहेत़ विशेष म्हणजे बहुतांश शेतकºयांनी पीक विमा भरला असून, अद्याप शेतकºयांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही़ परभणी तालुक्यातील जांब, मांडाखळी या दोन गावांमध्ये नुकसानीचा आकडा अधिक आहे़ तसेच गंगाखेड, सोनपेठ, पालम या तालुक्यातही अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे़ तेव्हा या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे़
हीच मागणी कृषी विभागाच्या अधिकाºयांकडे मांडण्यासाठी संघटनेचे किशोर ढगे, भास्कर खटींग, मुंजाभाऊ लोडे, केशव आरमळ, उस्मान पठाण आदी कार्यकर्ते कृषी विभागात दाखल झाले; परंतु, त्यावेळी कृषी अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांना त्यांचे म्हणणे मांडता आले नाही़ त्यामुळे खराब झालेले संत्रे या कार्यकर्त्यांनी कृषी अधिकाºयांच्या टेबलवर टाकून रोष व्यक्त केला़ दरम्यान, फळपिकांचे पंचनामे तातडीने न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे़

Web Title: Parbhani: Bad fruits thrown at officers' tables!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.