परभणी: लैगिंक शोषण प्रकरणात डॉक्टरचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 11:14 PM2019-07-06T23:14:58+5:302019-07-06T23:15:33+5:30
तालुक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका परिचारिकेचे सतत दोन वर्षे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.तौफिक हुसेन अन्सारी याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने ६ जुलै रोजी फेटाळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : तालुक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका परिचारिकेचे सतत दोन वर्षे लैगिंक शोषण केल्याप्रकरणी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.तौफिक हुसेन अन्सारी याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने ६ जुलै रोजी फेटाळला.
येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कंत्राटी परिचारिकेचे लैगिंक शोषण केल्या प्रकरणी १५ जून रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकारी डॉ.तौफिक हुसेन अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सपोनि.अहेमद शेख यांनी त्याच दिवशी मध्यरात्री आरोपी डॉ.अन्सारी याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. डॉ.अन्सारी याने जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर ६ जुलै रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने डॉ.अन्सारी याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.