परभणी : वाढत्या तापमानाचा केळीच्या बागांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 12:18 AM2019-05-04T00:18:15+5:302019-05-04T00:18:40+5:30
ढत्या तापमानाने पाणीपातळीत कमालीची घट झाली असून केळी बागांवर मोठे दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या स्थितीत आले असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी): वाढत्या तापमानानेपाणीपातळीत कमालीची घट झाली असून केळी बागांवर मोठे दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. झाडे उन्मळून पडण्याच्या स्थितीत आले असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.
तालुक्यातील निळा, फुलकळस, कान्हडखेड, पूर्णा आदी भागात केळीची लागवड झाली आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे केळी बागांना मोठा फटका बसत आहे. अनेक उपाययोजना करूनही उष्ण तापमानामुळे केळीचे नुकसान थांबता थांबेनासे झाले आहे. मागील आठवडाभरापासून पारा ४५ अंशाच्या वर आहे. या तापमानात कितीही पाणी दिले तरी केळीची पाने करपत आहेत. रात्रीच्या वेळी या केळीच्या बागांना पाणी देणे गरजेचे असताना विजेच्या लंपडावामुळे केळीला पाणी देणे शक्य होत नाही.
पूर्णा तालुक्यातील निळा येथील शेतकरी दिगंबर सूर्यवंशी, भगवान सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी ६ हजार केळीची झाडे लावली आहेत; परंतु, उन्हाच्या तीव्रतेमुळे ही झाडे अर्ध्यांतूनच उन्मळून पडत आहेत. यामुळे उत्पादन क्षमता कमी होत असून लाखो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उष्ण वाºयापासून सरंक्षण व्हावे.
जमिनीत ओलावा टिकून रहावा, यासाठी शेडनेट करावे, केळी बागांच्या चारही बाजूला गजराज गवत लावून काही प्रमाणात तरी संरक्षण होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला कृषी तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे; परंतु, उन्हाच्या तीव्रतेमुळे या उपाययोजनाही निष्फळ ठरत असल्याचे दिसून येत आहे.
दररोज दहा घडांचे नुकसान
४पूर्णा तालुक्यात दिवसेंदिवस वाढत जाणाºया तापमानामुळे बागायतदार शेतकरी हैराण झाले आहेत. एकीकडे पाणी नसल्याने उत्पादनात घट होत असतानाच दुसरीकडे मात्र वाढत्या तापमानाचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे.
४उष्ण वातावरण व हवेमुळे केळी बागेतील दररोज पाच ते दहा घड उन्मळून पडत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकºयांचे दिवसाकाठी अडीच हजार रुपयांचे नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे.