परभणी : एटीएमच्या सुरक्षेकडे बँकांचे दुर्लक्ष कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:58 AM2019-07-20T00:58:13+5:302019-07-20T00:58:20+5:30
प्रत्येक राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांकडून शहारात एटीएमची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र या एटीएमसह येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेकडे बँकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील ५ बँकांचे एटीएम असून एकाही ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने भूरट्या चोरट्यांना हातचलाखी तसेच पैसे लांबविण्यासाठी संधी मिळत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): प्रत्येक राष्ट्रीयकृत, खाजगी बँकांकडून शहारात एटीएमची सुविधा सुरु करण्यात आली आहे. मात्र या एटीएमसह येथे येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेकडे बँकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील ५ बँकांचे एटीएम असून एकाही ठिकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने भूरट्या चोरट्यांना हातचलाखी तसेच पैसे लांबविण्यासाठी संधी मिळत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
शहरातील स्टेट बँक आॅफ इंडियाचे २ एटीएम आहेत. तर बँक आॅफ बडोदा, आयसीआयसीआय, कॅनरा, धनलक्ष्मी कॉ. बँकेचे प्रत्येकी १ एटीएम सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे बँकेत रांगेत उभे राहून पैसे काढण्यापेक्षा एटीएमवर पैसे काढण्यावर सर्व ग्राहक, नागरिक भर देत आहेत; परंतु, याच बँकांकडून त्यांनी सुरु केलेल्या एटीमची सुरक्षा करण्यासाठी साधा सुरक्षारक्षकही नेमण्याची तसदी घेतल्या जात नाही. या एटीएमची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. यासर्व बाबींचा भार पोलीस प्रशासनावर पडत आहे. एटीममधून पैसे काढण्याकडे नागरिकांचा जास्त कल असल्याने दिवसभर या एटीएमवर गर्दी दिसूून येते. यामध्ये महिला, जेष्ठ नागरिक यांची संख्या लक्षणीय असते. या गर्दीत एटीएम पिन नंबर बघून कार्डाची आदलाबदल होण्याची दाट शक्यता असते. याचा फायदा भूरटे चोर घेण्याची शक्यता बळावली आहे. तसेच सुरक्षा रक्षक नसल्याने महिला व महाविद्यालयीन तरुणींनाही विविध अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. छेडछाडीची घटना वाढल्याचे समोर आले आहे. यामुळे बँकांनी एटीएमसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी २४ तास सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी ग्राहक, नागरिकांमधून केली जात आहे.
सुरक्षेकडे कानाडोळा
४मागील अनेक दिवसांपासून शहरात चोरीची प्रकरणे वाढली आहेत. दिवसा ढवळ्या आडत व्यापारी वामनराव कोक्कर यांच्या आडत दुकानावरील मुनिमानी बँकेतून काढलेले ५ लाख रुपये लांबविल्याची घटना ताजी असतानाच बँकांकडून ग्राहकांच्या सुरक्षेकडे कानाडोळा केला जात आहे.
४एटीएमवर येणाºया महिला, वयोवृद्ध यांना भूरट्या चोरांकडून टार्गेट केले जाण्याची शक्यता वाढली आहे. तसेच राज्यात अनेक ठिकाणी एटीएम मशीनच चोरुन नेल्याच्या घटना वाढल्या असल्याने शहरातील बँकांनी सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे अपेक्षीत आहे.
बँक प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
च्मानवत शहरात एकीकडे चोरीच्या घटना वाढत असताना बँक प्रशासन मात्र एटीएम केंद्रावर सुरक्षारक्षक नेमण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे नागरिकांना एटीएमवरून पैसे काढण्यासाठी धोका निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ट अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
शहरातील एटीएम असणाºया बँकांना लेखीपत्र देऊन सुरक्षारक्षक नेमण्यासह सीसीटीव्हीची दुरुस्ती करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही यावर बँक प्रशासनाचा कोणताच निर्णय झाला नाही.
-रमेश स्वामी, पोलीस निरीक्षक