परभणी बाजार समिती:ई-नाममध्ये १३ कोटी रुपयांची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 12:46 AM2019-02-23T00:46:31+5:302019-02-23T00:46:44+5:30
येथील बाजार समितीने शेतकऱ्यांकडून ९९ हजार ७६२ क्विंटल भुसार मालाची खरेदी करुन दोन वर्षात १३ कोटी ११ लाख रुपयांची ई-नाम योजनेंतर्गत उलाढाल केली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या माल विक्रीनंतर बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: येथील बाजार समितीने शेतकऱ्यांकडून ९९ हजार ७६२ क्विंटल भुसार मालाची खरेदी करुन दोन वर्षात १३ कोटी ११ लाख रुपयांची ई-नाम योजनेंतर्गत उलाढाल केली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या माल विक्रीनंतर बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत.
शेतकºयांच्या शेतमालाला सर्वोच्च भाव मिळावा, स्थानिक व्यापाºयांकडून अडवणूक होऊ नये, शेतमालाचे पैसे त्यांच्या बँक खात्यावर दिलेल्या मुदतीत जमा व्हावेत, एका बाजारपेठेतून दुसºया बाजारपेठेत माल विक्री करता यावा, यासाठी राज्य शासनाने २०१६ मध्ये राज्यातील ६० बाजार समित्यांमध्ये राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) योजना राबविण्यास सुरुवात केली.
यामध्ये शेतकºयांना शेतीमाल तारण योजनेचाही सुविधा उपलब्ध करुन दिली. परभणी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांतर्गत जवळपास १३१ गावे येतात. या गावातील शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या मार्केट यार्डात विक्रीस आणतो; परंतु, शेतकºयांच्या शेतमालाची कमी दराने खरेदी करुन व्यापाºयांकडून अडवणूक केली जावू लागली.
त्यामुळे २०१७ पासून परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीने ई-नाम योजना सुरु केली. योजना सुरुझाल्यापासून बाजार समितीच्या मार्केट यार्डात शेतकºयांनी १ लाख ७६ हजार ८२९ क्विंटल भुसार मालाची विक्री केली. त्यापैकी ९९ हजार ७६२ क्विंटल माल बाजार समितीने ई-नाम योजनेंतर्गत खरेदी केला. ६ हजार ६५५ क्विंटल मालाची बाजार समिती प्रशासनाकडून प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली.
दोन वर्षात या योजनेंतर्गत बाजार समितीने १३ कोटी ११ लाख रुपयांची उलाढाल केली आहे. ही उलाढाल राज्यात सर्वाधिक ठरली आहे.
सोलापूरमध्ये आज गौरव
४ई-नाममध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या बाजार समित्यांना २३ फेब्रुवारी रोजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यामध्ये परभणी बाजार समितीने प्रथम, दौंड द्वितीय, कोल्हापूर तृतीय तर वर्धा व नंदूरबार या दोन बाजार समित्यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे.