परभणी : तहसीलमध्ये अनुदानासाठी लाभार्थ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:39 AM2018-11-27T00:39:28+5:302018-11-27T00:40:44+5:30

तहसील कार्यालयामधून विविध योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण केले जाते़ हे अनुदान आता जातनिहाय वितरित केले जाणार असल्याने लाभार्थ्यांकडून पासबुक आणि आधार क्रमांकाची सत्यप्रत इ. कागदपत्रे घेतली जात आहेत़ ही कागदपत्रे दाखल करण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयात लाभार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती़

Parbhani: Beneficiaries of the beneficiaries in Tehsil | परभणी : तहसीलमध्ये अनुदानासाठी लाभार्थ्यांची गर्दी

परभणी : तहसीलमध्ये अनुदानासाठी लाभार्थ्यांची गर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तहसील कार्यालयामधून विविध योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाचे वितरण केले जाते़ हे अनुदान आता जातनिहाय वितरित केले जाणार असल्याने लाभार्थ्यांकडून पासबुक आणि आधार क्रमांकाची सत्यप्रत इ. कागदपत्रे घेतली जात आहेत़ ही कागदपत्रे दाखल करण्यासाठी सोमवारी तहसील कार्यालयात लाभार्थ्यांची मोठी गर्दी झाली होती़
राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या श्रावणबाळ, निराधार, संजय गांधी, अपंग, विधवा लाभार्थ्यांना दरमहा अनुदानाचे वाटप केले जाते़
नोव्हेंबर महिन्यासाठी तहसील प्रशासनाकडे अनुदानाची रक्कम उपलब्ध झाली असून, हे अनुदान जातनिहाय वितरित केले जाणार असल्याने लाभार्थ्यांकडून बँक पासबुकची झेरॉक्स व आधार कार्डची झेरॉक्स इ. कागदपत्रे घेतली जात आहेत़ सोमवारी सकाळपासूनच लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात कागदपत्रे दाखल करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले़ तहसील कार्यालयात लाभार्थ्यांची मोठी रांग लागली होती़ आणखी दोन दिवस कागदपत्र जमा करून घेतले जाणार असून, लाभार्थ्यांनी तात्काळ तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़
अपंगांच्या अनुदानात वाढ
राज्य शासनाच्या निर्णयानुसार अपंगांना दिल्या जाणाºया अनुदानात वाढ करण्यात आली आहे़ यापूर्वी सर्व अपंगांना ६०० रुपये प्रतिमहिना असे अनुदान दिले जात होते़ मात्र शासनाच्या निर्णयानुसार ४० ते ८० टक्के अपंग असलेल्या लाभार्थ्यांना ८०० रुपये आणि ८० ते १०० टक्के अपंग असलेल्या लाभार्थ्यांना १ हजार रुपये प्रतिमहिना अनुदान दिले जाणार आहे़
या लाभार्थ्यांचे कागदपत्रही तहसील कार्यालयात दाखल करून घेतले जात आहेत़

Web Title: Parbhani: Beneficiaries of the beneficiaries in Tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.