परभरणी : भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:53 PM2019-04-08T23:53:52+5:302019-04-08T23:54:23+5:30
शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री गुरुबुद्धी स्वामी संस्थान येथील पाडवा यात्रा उत्सवाची ८ एप्रिल रोजी हुरपल्ली व गव्हाची खीर या महाप्रसादाने सांगता झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी) : शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री गुरुबुद्धी स्वामी संस्थान येथील पाडवा यात्रा उत्सवाची ८ एप्रिल रोजी हुरपल्ली व गव्हाची खीर या महाप्रसादाने सांगता झाली.
श्री गुरुबुद्धी स्वामी पाडवा यात्रा महोत्सवास चैत्र पाडव्यानिमित्त सुरुवात झाली. या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी या महोत्सवाची महाप्रसादाने सांगता करण्यात आली. त्यानंतर शहरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते.
१२ क्विंटलची खीर
श्री गुरुबुद्धी स्वामी पाडवा यात्रेची ५० वर्षाहून अधिक जुनी परंपरा आहे. या यात्रेत गव्हाची खीर व डाळीच्या पिठापासून तयार झालेल्या हुरपल्ली या महाप्रसादास अनन्य साधारण महत्त्व आहे.
यावर्षी गहू, गूळ, तूप व इतर साहित्य मिश्रित १२ क्विंटलची खीर व १ क्विंटलची हुरपल्ली तयार करण्यात आली होती. यासाठी हळद शिजविण्याच्या मोठ्या कढईचा वापर करण्यात आला होता. यशस्वीतेसाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.