परभणी : शंकराचार्यांच्या हस्ते गंगाघाटाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:21 AM2018-09-29T00:21:51+5:302018-09-29T00:24:27+5:30
पूर्णा तालुक्यातील वझूर या गावात गोदावरी नदीकाठावर लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या गंगा घाट कामाचे भूमिपूजन २६ सप्टेंबर रोजी जगतगुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते झाले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पूर्णा तालुक्यातील वझूर या गावात गोदावरी नदीकाठावर लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या गंगा घाट कामाचे भूमिपूजन २६ सप्टेंबर रोजी जगतगुरु शंकराचार्य विद्या नृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते झाले़
वझूर गावालगत गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र आहे़ गोदाकाठी प्राचीन रामेश्वराचे मंदिर आहे़ यामुळे या ठिकाणी विविध धार्मिक विधी होतात़ परंतु, नदीकाठावर घाट नसल्याने भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत असे़ ही बाब लक्षात घेऊन येथील ज्येष्ठ नागरिक अॅड़ दादा पवार यांनी लोकसहभागातून घाट बांधण्याच्या कामासाठी पुढाकार घेतला़ कोणत्याही लोकप्रतिनिधीपुढे हात न पसरता ४० फूट उंचीचा व २०० फूट रुंद घाट बांधण्याचा प्रस्ताव ग्रामस्थांनासमोर ठेवला़ या प्रस्तावास ग्रामस्थांकडून प्रतिसादही मिळाला़ त्यानुसार बुधवारी ७ लाख रुपये खर्चाच्या घाट बांधकामाचे भूमिपूजन कोल्हापूरच्या करवीर पिठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते झाले़
यावेळी अॅड़ दादा पवार, आबासाहेब पवार, सरपंच लक्ष्मण लांडे, उपसरपंच गोदावरी पवार, केशव पवार, माऊली पवार, ज्ञानोबा पवार, भगवान पवार, रामेश्वर पवार, दत्तराव पवार, भारत कचरे, गोरख गव्हाणे, मनोहर कचरे, निलेश पवार, सुखानंद पवार, बाजीराव लाला, राजेभाऊ जोशी, दुर्गादास जोशी, विठ्ठल जोशी, बाळू महाराज आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़