परभणी : राणीसावरगावमध्ये मोठी आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 01:05 AM2018-12-20T01:05:02+5:302018-12-20T01:05:29+5:30
येथील दोन कापड दुकानांना १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री अचानक आग लागल्याने मोठी धावपळ झाली. अग्नीशमन दलाची गाडी उशिराने दाखल झाल्याने आगीतील नुकसानीचा आकडा वाढला. दरम्यान, अग्नीशमन दलासह पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
राणीसावरगाव (परभणी): येथील दोन कापड दुकानांना १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री अचानक आग लागल्याने मोठी धावपळ झाली. अग्नीशमन दलाची गाडी उशिराने दाखल झाल्याने आगीतील नुकसानीचा आकडा वाढला. दरम्यान, अग्नीशमन दलासह पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.
अहमदपूर-गंगाखेड रस्त्यावर राणीसावरगाव येथे राजू सालमोटे यांच्या मालकीच्या इमारतीत दयानंद देशमुख यांचे देशमुख क्लॉथ सेंटर व लक्ष्मण कवडे यांचे कवडे क्लॉथ सेंटर ही दोन दुकाने आहेत. बुधवारी मध्यरात्री साधारणत: २.१५ च्या सुमारास या दुकानांंना आग लागली. राजू सेलमोटे यांना दुसऱ्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी धावपळ करून कॉलनीतील नागरिकांना उठविले. शटर तोडून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आग वाढतच चालली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाला तसेच तहसील प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली. तहसीलदार व गंगाखेड नगरपालिकेच्या मुख्याधिकाºयांना ही माहिती मिळताच त्यांनी अग्नीशमन गाडी पाठविली; परंतु, गाडी येण्यास उशिर झाल्याने आगीचे लोट तिसºया मजल्याकडे जात होते. त्यामुळे आजूबाजुच्या घरांनाही धोका निर्माण झाला होता. नागरिकांनी सतर्कतेने प्रयत्न करून तिसºया मजल्यावरील तीन गॅस सिलेंडर बाहेर काढले. त्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, पिंपळदरी पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तलाठी मुळे यांनी घटनेचा पंचनामा केला असून देशमुख क्लॉथ सेंटरमध्ये २५ ते ३० लाख रुपयांचा माल जळून खाक झाला. तर कवडे क्लॉथ सेंटरमधील अंदाजे ३० ते ४० लाख रुपयांचा माल जळून खाक झाल्याची चर्चा आहे.
‘गंगाखेड शुगर’ची अग्नीशमन गाडी दाखल
४राणीसावरगाव येथे आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर गंगाखेड शुगरचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांनी तातडीने कारखान्यातील अग्नीशमन दलाची गाडी पाठविली. अग्नीशमनची गाडी दाखल झाल्यानंतरच या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. काही वेळाने आग पूर्णत: आटोक्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला; परंतु, ही आग विझवेपर्यंत दुकानातील कपडे पूर्णत: जळून खाक झाले. आगीच्या घटनेनंतर पोलीस कर्मचारी आणि परिसरातील नागरिक तातडीने मदतीला धावले. त्यामुळे आग आटोक्यात आणणे शक्य झाले.