परभणी : शेतकरी प्रश्नांवर भाजप करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:23 AM2020-02-18T00:23:14+5:302020-02-18T00:23:50+5:30
पीकविमा, दुष्काळी अनुदान, शेतीला सुरळीत वीज पुरवठा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पीकविमा, दुष्काळी अनुदान, शेतीला सुरळीत वीज पुरवठा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला़
परभणी येथे आ़ मेघना बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या ग्रामीण विभागाची सोमवारी बैठक झाली़ या बैठकीत जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार ३८३ शेतकऱ्यांना २ लाख ४८ हजार ७९३ हेक्टर जमिनीवरील सोयाबीनचा प्रतिहेक्टर ३० हजार रुपये प्रमाणे तत्काळ पीक विमा देण्यात यावा, शासनाने घोषित केल्याप्रमाणे ओल्या दुष्काळाचे २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी शेतकºयांना अदा करावेत, सरसकट कर्जमाफी करून सातबारा कर्जमुक्त व शेतकºयांना चिंतामुक्त करावे, शेतकºयांच्या पाल्यांनी घेतलेले शैक्षणिक कर्ज तत्काळ माफ करावे, हवामान आधारित पीकविमा फलोत्पादन शेतकºयांना तत्काळ द्यावे, चाटोरी, बनवस, चारठाणा मंडळातील शेतकºयांना ५ कोटींचा पीकविमा त्यांच्या खात्यावर वर्ग करावा, शेतकºयांना १२ तास दिवसभरात पूर्ण दाबाने वीज पुरवठा करावा आदी विविध मागण्यांसाठी २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला़ यावेळी आ़ मेघना बोर्डीकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ़ सुभाष कदम आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ बैठकीस अॅड़ रमेश गाळेगावकर, बालाप्रसाद मुंदडा, प्रताप देशमुख, व्यंकटराव तांदळे, विठ्ठल रबदडे, विश्वनाथ लाडाणे, सुशील रेवडकर, शिवाजी मव्हाळे, सिद्धू चोखट, रमाकांत जहागीरदार, अरुण गवळी, रंगनाथ सोळंके, व्यंकटराव कसपटे, डॉ़ उमेश देशमुख, बाळासाहेब भालेराव आदींची उपस्थिती होती़