परभणी :समाधान शिबीर भाजपाने केले ‘हायजॅक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:02 AM2018-02-08T00:02:43+5:302018-02-08T00:02:54+5:30

प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हाभरात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेले समाधान शिबीर भाजपानेच ‘हायजॅक’ केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला असून, स्थानिक लोकप्रतिनिधींना या शिबिराचे निमंत्रणही दिले गेले नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे़

Parbhani: BJP launches 'Hyacac' solution camp | परभणी :समाधान शिबीर भाजपाने केले ‘हायजॅक’

परभणी :समाधान शिबीर भाजपाने केले ‘हायजॅक’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हाभरात सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या नावाखाली सुरू करण्यात आलेले समाधान शिबीर भाजपानेच ‘हायजॅक’ केल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला असून, स्थानिक लोकप्रतिनिधींना या शिबिराचे निमंत्रणही दिले गेले नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे़
जिल्हाभरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशातून ग्रामीण भागात समाधान शिबीर घेण्यात येत आहे़ आॅनलाईन सातबाराचे वाटप, निराधार योजनेचा लाभ, ग्रामविकास विभागाकडून दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र, जॉबकार्डचे वाटप, मागेल त्याला शेततळे उपक्रमांतर्गत शेततळयांचे कार्यारंभ आदेश वितरण करणे आदींसाठी हे शिबीर घेण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते़ राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत बुधवारी जिंतूर व सेलू येथे हे शिबीर घेण्यात आले़ याशिवाय परभणी येथे ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या संदर्भात कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले आहे़ बुधवारी जिंतूर, सेलूत झालेल्या समाधान शिबिरासाठी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे या अधिकाºयांसह माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, मेघना बोर्डीकर, राहुल लोणीकर आदींची उपस्थिती होती़ यावेळी विरोधी पक्षातील स्थानिक लोकप्रतिनिधींची फारशी उपस्थिती नव्हती़ व्यासपीठावर मात्र भाजपाच्याच कार्यकर्त्यांची रेलचेल होती़ दोन्ही ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असले तरी या शिबिराच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेचा गैरवापर करीत भाजपाचा पक्षीय अजेंडा राबविला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील सदस्यांकडून केला जात आहे़ विशेष म्हणजे या शिबिराला स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रणच देण्यात आले नसल्याचे आ़ विजय भांबळे यांनी सांगितले़ त्यामुळे या शिबिराच्या आयोजना संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत़ सर्व ठिकाणच्या शिबिरांमध्ये पाणीपुरवठा मंत्री लोणीकर हे भाजपा सरकारचेच गुणगान करीत आहेत़ यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा वापर करणे ही दुर्दैवाची बाब आहे, असेही विरोधकांचे म्हणणे आहे़ भाजपा नेत्यांनी मात्र या आरोपांचा इन्कार करीत जनहितांच्या कामांसाठी हे शिबीर घेण्यात येत असल्याचे सांगून विरोधकांनी यात राजकारण करू नये, असा सल्लाही दिला आहे़
जनहितासाठी समाधान शिबीर-अभय चाटे
जनतेचा फायदा व्हावा, या उद्देशातून समाधान शिबिराचे जिल्हाभरात आयोजन करण्यात आले आहे़ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिकारी स्तरावर मर्यादा येतात़ या उलट या शासकीय योजनांची अधिक जनजागृती व्हावी, या दृष्टीकोनातून भाजपाचे पदाधिकारी काम करीत आहेत़ सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या चांगल्या कामांचा हा एक भाग आहे़ विरोधकांनी नाहक राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे यांनी दिली़
सरकारी यंत्रणेचा भाजपाकडून गैरवापर- विजय भांबळे
राज्यातील भाजपा सरकारकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे़ जिल्ह्यातही तशीच परिस्थिती पहावयास मिळत आहे़ आपण स्थानिक लोकप्रतिनिधी असूनही या शिबिराचे निमंत्रण दिले गेले नाही़ पक्षीय अजेंडा या शिबिराच्या माध्यमातून राबविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ कर्जमाफीत शेतकºयांची फसवणूक झाली़ नरेगाच्या एकाही कामाला मंजुरी देण्यात आलेली नाही़ त्यामुळे रोजगारासाठी जिंतूर तालुक्यातील जवळपास २० हजार मजूर कामासाठी बाहेरगावी गेले आहेत़ हा प्रश्न सोडविण्याकडे सत्ताधाºयांचे लक्ष नाही़ पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे़ परंतु, त्याचे एकही काम मंजूर नाही़ त्यामुळे भाजप सरकारच्या सर्वच घोषणा फसव्या आहेत, असा आरोप आ़ विजय भांबळे यांनी केला़
भाजपाकडून जनतेची दिशाभूल- राम खराबे
सेलू व जिंतूर येथे झालेल्या समाधान शिबिरासाठी लोकप्रतिनिधींना बोलावण्यात आले नाही़ योजनांच्या नावाखाली भाजपाकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे़ जिल्ह्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याऐवजी लोणीकर हे भाजपाचीच महती या शिबिरातून सांगत आहेत़, ही दुर्दैवी बाब आहे़ जिल्हाधिकारी, जि़प़ मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य प्रशासकीय अधिकाºयांच्या उपस्थितीत पक्षीय अजेंडा राबविणे हे चुकीचे आहे़, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिंतूर विधानसभाप्रमुख तथा जि़प़तील शिवसेनेचे गटनेते राम खराबे यांनी दिली़

Web Title: Parbhani: BJP launches 'Hyacac' solution camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.