परभणी : नव महाराष्ट्र घडविण्यासाठी आशीर्वाद द्या- आदित्य ठाकरे यांचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:41 PM2019-08-03T23:41:51+5:302019-08-03T23:43:38+5:30
नव महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाच आहे आणि तो घेण्यासाठी मी जनआशीर्वाद यात्रेनिमित्त परभणीत आलो आहे. त्यामुळे नव महाराष्ट्र घडविण्यासाठी मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: नव महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी महत्वाच आहे आणि तो घेण्यासाठी मी जनआशीर्वाद यात्रेनिमित्त परभणीत आलो आहे. त्यामुळे नव महाराष्ट्र घडविण्यासाठी मला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
शिवसेनेच्या वतीने आयोजित जनआशीर्वाद यात्रेनिमित्त शनिवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जिंतूर रस्त्यावर नूतन महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्जुन खोतकर, चंद्रकांत खैरे, सचिन आहेर, खा. संजय जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, अर्जुन सामाले, गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, सखूबाई लटपटे, अंबिका डहाळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आदर्श महाराष्ट्र घडविण्यासाठी जनतेने मला आशीर्वाद द्यावेत. यासाठी हा दौरा आहे. राजकारणाशी या जनआशीर्वाद यात्रेचा कोणताही संबंध नाही. परभणीकरांचे प्रेम खूप मोठे आहे. परभणी शहराला विकसित बनविण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. नव महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात परभणीपासूनच सुरु करण्यात येणार आहे. अडचणीच्या काळात शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी आहे. पीक विमा किंवा पाण्याचा प्रश्न किंवा रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेनेच पुढाकार घेतला आहे. यापुढेही तो कायम आहे. माझ्या नव्हे तर तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी तरुणांसह वयोवृद्धांनी मला आशीर्वाद द्यावेत, असे ते म्हणाले.
यावेळी आ.डॉ.राहुल पाटील यांनी अवघा महाराष्ट्र आदित्य ठाकरे यांना नवे नेतृत्व म्हणून पाहत आहे. मराठी मुलांना नवीन तंत्रज्ञान मिळाले पाहिजे, यासाठी आदित्य ठाकरे पुढाकार घेत आहेत. या रोजगार मेळाव्यातून ७ हजार ५०० तरुणांना रोजगार देण्याचे काम केले जाईल, असेही आ.डॉ.पाटील यांनी प्रस्ताविकात म्हटले. अभय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
यशस्वीतेसाठी शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
दीड हजार दिव्यांगांना साहित्य वाटप
४ंआ.डॉ.राहुल पाटील यांच्या वतीने आयोजित रोजगार महामेळाव्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जिल्ह्यातील दीड हजार दिव्यांगाना श्रवणयंत्र, ब्रेल मोबाईल,स्वयंचलित स्काय सायकल, कृत्रिम अवयव आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. या साहित्यामुळे दिव्यांगाच्या चेहºयावर समाधान होते.
४दुष्काळावर मात करण्यासाठी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून वृक्ष क्रांती अभियानाचे उद्घाटही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानांतर्गत शहरात ५० हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. या वृक्षांचे संवर्धनही शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.