परभणी : दर्शनासाठी जाणाऱ्या महिलेचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:06 AM2018-03-27T01:06:42+5:302018-03-27T01:06:42+5:30
दर्शनासाठी आश्रमामध्ये जाणाºया एका ३१ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना डिग्रस येथे २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): दर्शनासाठी आश्रमामध्ये जाणाºया एका ३१ वर्षीय महिलेचा गळा आवळून खून झाल्याची घटना डिग्रस येथे २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.
डिग्रस येथील नंदाबाई बंडू गाढवे (३१) या २५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावापासून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या दत्ताश्रमात दर्शनासाठी जात होत्या. दर रविवारी या आश्रमात भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होतात.
या कार्यक्रमांना नंदाबाई नित्यनेमाने जात होत्या. २५ मार्च रोजीही दर्शनासाठी जात असतानाच अज्ञात व्यक्तींनी रस्ता अडवून त्यांचा दोरीने गळा आवळून खून केला. तसेच आरोपींनी दगडाने चेहºयावर वार केल्याचेही व्रण आहेत. दरम्यान, नंदाबाई गाढवे यांचा मृतदेह जिंतूर ग्रामीण रुग्णालयात आला असून उत्तरीय तपासणीचे काम सुरु होते. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक तालेवार, कांबळे, सूर्यवंशी, डुबे आदींनी घटनास्थळाचा पंचनामा केला. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता.