परभणीत बोर्डीकर- वरपुडकरांच्या नेतृत्वाची अग्नीपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:35 AM2019-10-12T00:35:06+5:302019-10-12T00:35:50+5:30

जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षांपासून सातत्याने सक्रिय असलेले माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वाची या विधानसभा निवडणुकीत अग्नीपरीक्षा होणार असून त्यांचा राजकीय वारस ठरविण्यावरही या निमित्ताने शिक्कामोर्तब होणार आहे.

Parbhani Borderek - A fire test led by Varpudkar | परभणीत बोर्डीकर- वरपुडकरांच्या नेतृत्वाची अग्नीपरीक्षा

परभणीत बोर्डीकर- वरपुडकरांच्या नेतृत्वाची अग्नीपरीक्षा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षांपासून सातत्याने सक्रिय असलेले माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या नेतृत्वाची या विधानसभा निवडणुकीत अग्नीपरीक्षा होणार असून त्यांचा राजकीय वारस ठरविण्यावरही या निमित्ताने शिक्कामोर्तब होणार आहे.
जिंतूर मतदारसंघातून तब्बल चारवेळा विधानसभेत आणि एकवेळा विधानपरिषदेत जाण्याचा मान माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांनी मिळविला आहे. गेल्या ४० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणात ते सातत्याने सक्रिय असून या कालावधीत त्यांनी अनेक चढउतार अनुभवले आहेत. जिल्हा बँकेच्या पीक विमा प्रकरणात ते अडचणीत सापडले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या जोमाने ते निवडणुकीत उतरले आहेत. जिंतूर मतदारसंघात नेहमीप्रमाणे बोर्डीकर- भांबळे अशीच लढत होत असली तरी यावेळेच्या लढतीत थोडासा बदल झाला आहे. माजी आ.बोर्डीकर यांच्या कन्या मेघना बोर्डीकर या यावेळी भाजपाकडून निवडणूक लढवित आहेत. मेघना यांना निवडून आणण्यासाठी बोर्डीकर यांनी आपला ४० वर्षाचा राजकीय अनुभव पणास लावला असून त्यांची जुनी टीम पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. वयाचे ६३ वर्षे पूर्ण झाले असतानही बोर्डीकर हे तरुणांप्रमाणे त्याच आक्रमकतेने प्रचार यंत्रणा राबवित आहेत. २०१९ ची निवडणूक त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. आ.विजय भांबळे यांनी गेल्या १५ वर्षापासून बोर्डीकर यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. दोनवेळा भांबळे यांना यात अपयश आले; परंतु, प्रयत्न करणे त्यांनी सोडून दिले नाही व तिसऱ्यांदा त्यांनी यश मिळविले. याशिवाय भांबळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपला वरचष्मा कायम ठेवत बोर्डीकर यांच्या वर्चस्वाला शह दिला. आता बोर्डीकर यांनी भांबळे यांच्या वर्चस्वाला शह देण्याचा चंग बांधला असून देशपातळीवर सध्या यशोशिखरावर असलेल्या भाजपात प्रवेश करुन त्यांनी ही लढाई आणखी तीव्र केली आहे. यामध्ये त्यांना कितपत यश येईल आणि त्यांच्या कन्या मेघना या विधानसभेत पोहचतात की तीन निवडणुकांमधून आलेल्या अनुभवातून पुन्हा एकदा विजय भांबळे आपली जागा कायम राखतात, हे २४ आॅक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे जिल्ह्याच्या राजकारणातील सुरेश वरपूडकर हेही एक मातब्बर नेते आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी- पुन्हा काँग्रेस असा प्रवास करुन आता पुन्हा एकदा ते पाथरीच्या आखाड्यात उतरले आहेत. गेल्या ४० वर्षापासून वरपूडकर हेही जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनीही राजकारणातील अनेक चढउतार अनुभवले. १९९८ मध्ये लोकसभा गाठली. २००४ मध्ये सिंगणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर राज्यातील आघाडी सरकारच्या काळात काही महिन्यांसाठी त्यांना कृषी राज्यमंत्रीपदही मिळाले होते. चारवेळा विधानसभेला तर एकवेळा लोकसभेला त्यांना यश मिळाले. दोन विधानसभा व एका लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीतील मत विभाजनामुळे पाथरीत त्यांचा पराभव झाला असला तरी परभणी शहर व तालुक्यातील राजकारणावरची पकड त्यांनी कायम ठेवली आहे. अडीच वर्षापूर्वी परभणी महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. परभणी पंचायत समितीही त्यांनी ताब्यात घेतली. आता २०१९ मध्ये ते पुन्हा पाथरी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवित आहेत. ही निवडणूक त्यांच्याही राजकीय कारकिर्दीसाठी अत्यंत महत्वाची आहे. त्यांच्या विजयासाठी त्यांच्या सुनबाई प्रेरणाताई वरपूडकर यांनी प्रचाराचे रान उठविले आहे. त्यामुळे भविष्यात वरपूडकर यांचा वारस त्यांच्या सुनबाई असणार असल्याची चर्चा सुरु असली तरी त्यांचे चिरंजीव समशेर वरपूडकर हे ही राजकारणात सक्रिय आहेत. या निवडणुकीत संपूर्ण वरपूडकर कुटुंबिय प्रचारात उतरले असून त्यांचा सामना अपक्ष म्हणून निवडून आलेले व शिवसेनामार्गे भाजपात दाखल झालेले आ. मोहन फड यांच्याशी होत आहे. फड यांना भाजपाचे वलय मिळाले असले तरी वरपूडकर हे ही दिग्गज नेते असून त्यांना अनेक निवडणुकांचा अनुभव आहे. या निवडणुकीत अनुभवाच्या जोरावर वरपूडकर बाजी मारतात की वक्तृत्व कौशल्य नसतानाही पक्षाची साथ आणि टीमवर्कमुळे फड सरस ठरतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील दोन्ही दिग्गज नेत्यांची राजकीय मैत्री चर्चेची
४जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज नेते सुरेश वरपूडकर आणि रामप्रसाद बोर्डीकर यांची राजकीय मैत्री एकेकाळी चर्चेचा विषय होती. नंतर मात्र या दोन नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि तीन वर्षापूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हे दोन्ही नेते आमने-सामने आले.
४यामध्ये वरपूडकरांनी बोर्डीकरांच्या पॅनलवर मात करीत त्यांच्या ताब्यातील जिल्हा बँक आपल्याकडे खेचून घेतली. विशेष म्हणजे तत्पूर्वीच्या संचालक मंडळात हे दोन्ही नेते एकाच गटात होते. त्यामुळे राजकारणात कोणाची किती दिवस मैत्री टिकेल, हे सांगणे कठीण आहे, याचाच अनुभव परभणीकरांना या निमित्ताने आला.

Web Title: Parbhani Borderek - A fire test led by Varpudkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.