परभणी : बीएसएनएलमधील चोरी प्रकरणात दोघे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:50 AM2019-03-30T00:50:50+5:302019-03-30T00:51:26+5:30
येथील एमआयडीसी भागातील भारत संचार निगम कार्यालयाच्या आवारातील ४१ लोखंडी ब्रॅकेट चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी २८ मार्च रोजी रात्री अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील एमआयडीसी भागातील भारत संचार निगम कार्यालयाच्या आवारातील ४१ लोखंडी ब्रॅकेट चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी २८ मार्च रोजी रात्री अटक केली आहे.
बीएसएनएलच्या कार्यालय परिसरातून ४१ ब्रॅकेट चोरीला गेल्याची घटना २७ मार्च रोजी घडली. कनिष्ठ दूरसंचार अधिकारी मोहम्मद सलीम जावेद अन्सारी यांच्या फिर्यादीवरुन नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी एमआयडीसी भागात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्याअधारे २८ मार्च रोजी रात्री एमआयडीसी परिसरातून जाणारी एक आॅटोरिक्षा पोलिसांनी थांबविली. शेख अल्लाउद्दीन शेख करीमोद्दीन व रिझवान शेख इब्राहीम हे दोघे या आॅटोरिक्षामध्ये बसले होते. पथकाने आॅटोची झडती घेतली असता ४१ लोखंडी ब्रॅकेट मिळून आले. आरोपींनी हे ब्रॅकेट बीएसएनएल कंपनीच्या एमआयडीसी कार्यालयातून चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने केली.