परभणी:कोट्यावधींची इमारत बनली शोभेची वास्तू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:12 AM2019-04-20T00:12:23+5:302019-04-20T00:13:09+5:30

या वर्षीचे शैक्षणिक सत्र संपले तरी समग्र शिक्षा अभियानांतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची इमारत सुरु न झाल्याने शिक्षण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वसतिगृहासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची तात्पुरती सोय कस्तुरबा गांधी विद्यालयात करण्यात आली होती.

Parbhani: The building of billions of rupees was made of ornamental architecture | परभणी:कोट्यावधींची इमारत बनली शोभेची वास्तू

परभणी:कोट्यावधींची इमारत बनली शोभेची वास्तू

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): या वर्षीचे शैक्षणिक सत्र संपले तरी समग्र शिक्षा अभियानांतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाची इमारत सुरु न झाल्याने शिक्षण प्रेमींमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वसतिगृहासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची तात्पुरती सोय कस्तुरबा गांधी विद्यालयात करण्यात आली होती.
माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या गळतीचे प्रमाण थांबविण्यासाठी केंद्रशासन आणि राज्यशासन समग्र शिक्षा अभियान राबविते. या अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शाळेपासून घर दूर असलेल्या पालकांची आर्थिक दुर्बलता अथवा अन्य सामाजिक कारणांमुळे मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थिनींना आपले शिक्षण पुढे सुरु ठेवता यावे, हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. बहुसंख्य विद्यार्थिनींपर्यंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पोहोचावे, यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आताचे समग्र शिक्षा अभियानांतर्गत तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृह उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
या ठिकाणी नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची निवासाची नि:शुल्क सोय करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला होता. या वसतिगृहासाठी शहरातील नवा मोंढा परिसरात असलेल्या जिल्हा परिषद प्रशालेच्या परिसरातील जागा निवडण्यात आली होती. या जागेवर कोट्यावधी रुपये खर्च करुन या ठिकाणी सुसज्ज इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन एका वर्षाची कालावधी उलटून गेला तरी वसतिगृह सुरु झाले नाही. सद्य स्थितीत ही इमारत शोभेची वास्तू बनली आहे. या वर्षी शैक्षणिक सत्र सुरु झाल्यानंतर या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती.
७० ते ८० विद्यार्थिनींनी नोंदणीही केली होती. मात्र वसतिगृह सुरु झाले नसल्याने या विद्यार्थिनींची तात्पुरती सोय कस्तुरबा गांधी विद्यालयात करण्यात आली होती. या ठिकाणी कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्याने निवासासाठी कस्तुरबा गांधी विद्यालयाची इमारत अपुरी पडत असल्याने मुलीना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या मुलीची तात्पुरती निवासाची व्यवस्था झाली नाही, अशा नोंदणी केलेल्या विद्यार्थिनींना आपल्या गावातून प्रवास करुन विद्यालय गाठावे लागत होते. काही विद्यार्थिनींच्या पालकांची आर्थिक स्थिती हलाख्याची असल्याने त्यांना मुलींचे शिक्षण थांबवावे लागत आहे.
त्यामुळे पुढील वर्षातील शैक्षणिक सत्रात तरी वसतिगृह सुरु करावे, अशी मागणी विद्यार्थिनी, पालकातून होत आहे.
इमारत पूर्ण; सुविधांचा अभाव
४या वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी या ठिकाणी विद्यार्थिनींसाठी लागणारे फर्निचर, खाट उपलब्ध झाले नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच या वसतिगृहासाठी गृहपाल, चौकीदार, स्वयंपाकी, सहाय्यक ही पदे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहिरात देऊन भरण्यात येणार आहेत. याबाबतची निवड प्रक्रियाच सुरु झाली नाही. त्यामुळे विद्यार्थीनींना पुढील शैक्षणिक वर्षात तरी रहाण्याची सुविधा उपलब्ध देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
या घटकाला: होतोय लाभ
१४ ते १८ वर्षे वयोगटातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक समुदाय तसेच दारिद्ररेषेखालील कुटुंबातील इयत्ता ९ वी आणि १२ वी च्या वर्गातील विद्यार्थिनींचा गट हा या योजनेचा लक्ष्य गट आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थिनींना या वसतिगृहांमध्ये प्राधान्यक्रमाने प्रवेश दिला जातो . किमान ५० टक्के विद्यार्थिनी या अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्यांक आदी घटकातील असाव्यात असा आदेश आहे.

Web Title: Parbhani: The building of billions of rupees was made of ornamental architecture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.