परभणी : ट्रॅक्टरसह दीड एकर ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:26 AM2019-02-14T00:26:14+5:302019-02-14T00:26:27+5:30
तालुक्यातील देवेगाव येथील एका शेतकऱ्याच्या ऊस पिकात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अचानक आग लागल्याने ट्रॅक्टरसह दीड एकरवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : तालुक्यातील देवेगाव येथील एका शेतकऱ्याच्या ऊस पिकात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला अचानक आग लागल्याने ट्रॅक्टरसह दीड एकरवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली़
पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील शेतकरी विकास राधाकिशन गलबे यांनी आपल्या तीन एकरामध्ये ऊस पीक घेतले होते़ सध्या हे पीक काढणीला आल्याने उसाची तोडणी करून आष्टी येथील समृद्धी कारखान्याकडे हा ऊस गाळपास जात होता़ विशेष म्हणजे दीड एकरवरील ऊस तोडणी करून त्याचे गाळपही झाले आहे; परंतु, उर्वरित क्षेत्रावरील ऊस तोडून ट्रॅक्टरमध्ये भरीत असताना ट्रॅक्टरला अचानक लाग लागली़ या आगीमध्ये ट्रॅक्टरसह दीड एकरवरील ऊस जळून खाक झाला़ आग लागल्याची घटना कळताच पाथरी येथील अग्निशमन दलाला कळविले़ या अग्निशमन दलाने बंबाच्या सहाय्याने ही आग विझवून आटोक्यात आणली़ त्यामुळे पुढील अनर्थ टळला़ ऊस पिकाच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून ऊस उत्पादकाला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे़