परभणी : कोबिंग आॅपरेशन;१५ जणांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:37 PM2018-08-31T23:37:49+5:302018-08-31T23:38:30+5:30

विविध गुन्ह्यांमध्ये जामिनावर असताना फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी कोतवाली पोलिसांनी राबविलेल्या कोबिंग आॅपरेशनमध्ये पाच जणांना पकडण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.

Parbhani: Cabbage Operation; 15 people caught | परभणी : कोबिंग आॅपरेशन;१५ जणांना पकडले

परभणी : कोबिंग आॅपरेशन;१५ जणांना पकडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विविध गुन्ह्यांमध्ये जामिनावर असताना फरार झालेल्या आरोपींना पकडण्यासाठी कोतवाली पोलिसांनी राबविलेल्या कोबिंग आॅपरेशनमध्ये पाच जणांना पकडण्यात आले आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.
परभणी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गुन्ह्यांमध्ये जामिनावर असलेले काही आरोपी फरार असल्याचे समोर आले. त्यानंतर या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या पथकाने गुरुवारी रात्री विविध ठिकाणी कोबिंग आॅपरेशन केले. त्यामध्ये शेख रशीद शेख गुलाम (रा.क्रांतीनगर), सुनील आरळसिंग टाक (उड्डाणपूल परिसर), भगवान शामऱ्या काळे (रा.साखला प्लॉट), शेख फैमोद्दीन शेख शरीफ (रा.हमीद कॉलनी), सय्यद अरीफ स. वहाब (रा.दर्गारोड) या पाच आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने या सर्वांची कारागृहात रवानगी केली आहे. या कारवाईत सपोनि.सुनील गिरी, फौजदार जंत्रे, खान, पोहेकॉ.सातपुते, राठोड, गुंगे, रामा कदम, मोहसीन, मेदपिंपळे, रिझवाना शेख यांनी सहभाग नोंदविला.
गंगाखेडमध्ये दहा जणांना घेतले ताब्यात
गंगाखेड पोलीस ठाण्याच्या वतीने विविध गुन्ह्यात सहभागी असलेल्या; परंतु, गेल्या अनेक महिन्यांपासून न्यायालयात तारखेला हजर न राहणाºया १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना दंड आकारला व त्यांची जामिनावर सुटका केली. आरोपी राजू पिराजी आवचार, बाबा खान जलील खान, फजल खान याकूब खान, शेख मुख्तार शेख ईस्माईल, सय्यद मुसा सय्यद शबीर, शेख बावोद्दीन शेख वजीर, सय्यद एजाज सय्यद गौस, संजय मोतीराम चव्हाण, प्रकाश नारायण चव्हाण व बळीराम मसनाजी देवकते या १० आरोपींना विविध ठिकाणावरुन ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना २०० ते ५ हजार रुपये दंड आकारुन त्यांची जामिनावर सुटका केली.

Web Title: Parbhani: Cabbage Operation; 15 people caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.