आरोग्याच्या रोडमॅपसाठी परभणीचे शिबीर उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:17 AM2018-02-18T00:17:02+5:302018-02-18T00:17:08+5:30

येथे शिवसेनेच्या वतीने आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे डाक्युमेंटशन होणे आवश्यक आहे़ त्यामुळे भविष्यकाळात या भागातील आरोग्याचा रोडमॅप तयार करण्यासाठी या शिबिराचा उपयोग होईल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी येथे बोलताना केले़

Parbhani Camp for Healthy Roadmap | आरोग्याच्या रोडमॅपसाठी परभणीचे शिबीर उपयुक्त

आरोग्याच्या रोडमॅपसाठी परभणीचे शिबीर उपयुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथे शिवसेनेच्या वतीने आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचे डाक्युमेंटशन होणे आवश्यक आहे़ त्यामुळे भविष्यकाळात या भागातील आरोग्याचा रोडमॅप तयार करण्यासाठी या शिबिराचा उपयोग होईल, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी येथे बोलताना केले़
परभणी येथे शिवसेनेच्या वतीने आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या पुढाकारातून १३ फेब्रुवारीपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास शनिवारी आरोग्यमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी भेट दिली़ यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते़ व्यासपीठावर आ़ डॉ़ राहुल पाटील, जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ़ वेदप्रकाश पाटील, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, बाजार समितीचे संचालक गंगाप्रसाद आणेराव, आयएमएचे जिल्हाध्यक्ष राजू सुरवसे, डॉ़ अश्विन पाटील, डॉ. जावेद अथर आदींची उपस्थिती होती़ यावेळी बोलताना आरोग्यमंत्री डॉ़ सावंत म्हणाले की, परभणी येथे आयोजित करण्यात आलेले महाआरोग्य शिबीर विक्रमी ठरले आहे़ या शिबिरात ९० हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यातील ८ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत़ प्रसिद्ध नेत्र रोग तज्ज्ञ डॉ़ तातेराव लहाने यांनीही या शिबिरात भाग घेऊन रुग्णांची तपासणी केली़ त्यांच्याकडूनही डोळ्याच्या शस्त्रक्रिया जातील़ परंतु, त्यानंतरही काही वेगळ्या आजाराच्या व खर्चिक शस्त्रक्रिया असतील तर मी स्वत: त्या विनामूल्य करून देईल, असा शब्दही यावेळी त्यांनी दिला़ आ़ डॉ़ पाटील यांच्या कार्याचे कौतुक करताना डॉ़ सावंत म्हणाले की, परभणीकर जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन डॉ़ पाटील यांनी नि:स्वार्थ भावनेतून आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांना लाभ मिळाला आहे़ या शिबिराने आरोग्य विभागाचे काम सोपे झाले आहे़ या शिबिराचे डाक्युमेंटेशन झाले पाहिजे़ कारण भविष्य काळात या भागातील आजारांच्या अनुषंगाने रोडमॅप तयार करण्यासाठी या शिबिराचा उपयोग होईल़ रोगमुक्त महाराष्ट्राच्या चळवळीस या निमित्ताने परभणीतून प्रारंभ झाला आहे, असेही ते म्हणाले़ यावेळी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले़ यावेळी उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, तालुकाप्रमुख नंदू आवचार, अनिल डहाळे, संदीप झाडे, नवनीत पाचपोर, नगरसेवक प्रशास ठाकूर, चंदू शिंदे, सुशील कांबळे, विजय ठाकूर, राहुल कांबळे, प्रसाद चामणे, मारोती तिथे, अजय पेदापल्ली, असलम शेख आदींची उपस्थिती होती़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले़ यावेळी आयएमएच्या टेलीफोन डिरेक्ट्रीचे प्रकाशन करण्यात आले़ यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांची उपस्थिती होती़
सव्वा कोटींच्या औषधींचे वाटप
शहरातील नूतन विद्यालयाच्या प्रांगणात १३ फेब्रुवारीपासून या शिबिरास सुरुवात झाली़ शनिवारी या शिबिराचा समारोप झाला़ गेल्या पाच दिवसांत या शिबिरात ९० हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये गरजूंना जवळपास सव्वा कोटी रुपयांच्या औषधींचे मोफत वाटप करण्यात आले असल्याची माहिती संयोजक आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिली़ परभणीकरांचे आरोग्य चांगले व सुदृढ रहावे यासाठी शिवसेनेच्या वतीने या पुढेही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचे यावेळी आ़ पाटील यांनी सांगितले़
जिल्हा रुग्णालयातील प्रश्न सहा महिन्यांत सोडविणार
या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी आरोग्यमंत्री डॉ़ सावंत यांच्याशी संवाद साधला़ त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, जिल्हा रुग्णालयात सद्यस्थितीत मुबलक प्रमाणात अधिकाºयांची पदे भरलेली आहेत़ सिटीस्कॅन मशीनसह अन्य सुविधांचे प्रश्न सहा महिन्यांत सोडविण्यात येतील़ शहरात नव्याने मंजूर झालेल्या स्त्री रुग्णालयाच्या कामाला गती मिळावी, यासाठी आपण वैयक्तीकरित्या लक्ष देऊन व त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी डॉ़ सावंत यांनी दिली़
पाच इमारतींचे लोकार्पण
आरोग्यमंत्री डॉ़ दिपक सावंत यांच्या हस्ते शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील ५ इमारतींचे लोकार्पण करण्यात आले़ त्यात आरोग्य विभाग व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा रुग्णालय येथील प्रशासकीय इमारत, औषधी भांडार इमारत, मनोरुग्ण, बालरुग्ण व कैदी कक्ष इमारत, बाह्य रुग्ण विभाग, विस्तारीकरण पहिला मजला, अपघात विभाग नूतनीकरण इमारत आणि मेट्रो ब्लड बँक इमारत आणि रुग्णांच्या नातेवाइकांसाठी बांधलेल्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले़ यावेळी खा़ बंडू जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, सीईओ बी़पी़ पृथ्वीराज, आरोग्य उपसंचालक डॉ़ विजय कंदेवाड, जिल्हा शल्यचिकित्सक जावेद अथर, डॉ़ प्रकाश डाके, संजय पार्डीकर आदींची उपस्थिती होती़

Web Title: Parbhani Camp for Healthy Roadmap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.