परभणी : दरवाढीच्या निषेधार्थ सह्यांची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2020 12:42 AM2020-02-13T00:42:43+5:302020-02-13T00:43:15+5:30

नळजोडणीसाठी महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ११ हजार रुपयांच्या दरांना शहरातून आता विरोध वाढत चालला असून, मंगळवारी सायंकाळी वसमत रस्त्यावरील विद्यापीठ गेटसमोर ज्येष्ठ नागरिकांनी या निर्णयाविरुद्ध सह्यांची मोहीम सुरू केली.

Parbhani: A campaign to sign the protest | परभणी : दरवाढीच्या निषेधार्थ सह्यांची मोहीम

परभणी : दरवाढीच्या निषेधार्थ सह्यांची मोहीम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नळजोडणीसाठी महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ११ हजार रुपयांच्या दरांना शहरातून आता विरोध वाढत चालला असून, मंगळवारी सायंकाळी वसमत रस्त्यावरील विद्यापीठ गेटसमोर ज्येष्ठ नागरिकांनी या निर्णयाविरुद्ध सह्यांची मोहीम सुरू केली.
नळजोडणीचे दर सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत. त्यामुळे हे दर कमी करावेत, अशी मागणी होत आहे. येथील काँग्रेसचे नगरसेवक सचिन देशमुख यांनी हा प्रश्न उचलून धरला शहरातील विविध सामाजिक संस्थांकडून मनपाला निवेदन देत हे दर कमी करण्याची मागणी केली जात आहे. त्यात आता ज्येष्ठ नागरिकांचीही भर पडली आहे.
१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर ज्येष्ठ नागरिकांनी सह्यांची मोहीम सुरू केली. दरवाढ कमी करण्याच्या मागणीवर १२५ नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या. बुधवारी शिवाजी चौक, जिंतूर रोड व इतर भागातही ही मोहीम राबविली जाणार असून, एक हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन मनपा आयुक्तांना दिले जाणार असल्याची माहिती ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी दिली.
अ.भा. कैकाडी महासंघटना
४अखिल भारतीय कैकाडी महासंघटनेच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी याच प्रश्नांवर आयुक्तांना निवेदन देण्यात आले. शहरातील नागरिकांना विश्वासात न घेता दरवाढ करण्याचा ठराव घेण्यात आला. नळजोडणीसाठी लावलेले दर अव्वाच्या सव्वा असून, सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. तेव्हा जनतेचा विचार करुन अनामत रकमेसह ६ ते ७ हजार रुपये दर ठेवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर संस्थापक संजय भेंडे, अमोल माने, दिगंबर जाधव, शिवाजी जाधव, अरुण जाधव, विठ्ठल गायकवाड, संजय गायकवाड, राजाभाऊ जाधव, अशोक गायकवाड, सुनील जाधव, श्रावण देशमुख, संभाजी शिंदे, गंगाधर शिंदे, गणेश पवार, श्रीकांत चव्हाण, शंकर सोळंके, शंकर पवार आदींची नावे आहेत.
जेवढा खर्च तेवढेच पैसे घ्या- खापरे
४नळ जोडणीसाठी ग्राहकाला जेवढा खर्च येणार आहे, तेवढ्याच रक्कमेचे बिल ग्राहकाकडून घ्यावे. सरसकट ११ हजार रुपये जोडणीसाठी घेणे योग्य राहणार नाही. महापालिकेने नागरिकांना नाहक आर्थिक भूर्दंड देऊ नये, अशी मागणी शिवलिंग खापरे यांनी केली आहे.

Web Title: Parbhani: A campaign to sign the protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.